इस्रायल-अमेरिकेचा इराणला धक्का, टॉपचा अधिकारी अली लारिजानी ठार; कसं केलं ट्रॅक?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
इराणचा आणखी एक मोठा नेता इस्रायलनं ठार केलाय. त्यामुळे इराणसमोर नेतृत्व आणि देश वाचवणं एक आव्हान बनलंय.
Iran- Israel War: अमेरिका इराण युद्धाच्या पहिल्या काही तासातच इराणच्या नेतृत्वाची फळी अमेरिका आणि इस्रायलं संपवली. तरी इराण प्रतिकार करत होता. आता इराणला आणखी एक मोठा धक्का बसलाय. इराणचा आणखी एक मोठा नेता इस्रायलनं ठार केलाय. त्यामुळे इराणसमोर नेतृत्व आणि देश वाचवणं एक आव्हान बनलंय.
इराण आणि अमेरिकेच्या युद्धात दोन्ही बाजूंकडून जोरदार हल्ले केले जात आहेत
अशातच अमेरिका आणि इस्रायलनं इराणला मोठा धक्का दिला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी हे देखिल इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार झाले आहेत. लारिजानी हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी परिदास भागात गेले होते, तेव्हाच इस्रायलनं मिसाईल हल्ला केला. यावेळी त्यांचा मुलगा आणि बॉडीगार्डससोबत होते. इस्रायलने केलेल्या या हल्ल्यात इमारत उद्धवस्त झाली आहे.
advertisement
इस्रायलच्या हल्ल्यात अली लारिजानी यांच्यासोबत त्यांचा मुलगा मोर्तजा लारिजानी, त्यांचे डेप्युटी अलीरेजा बायात आणि अनेक बॉडिगार्डस मारले गेले आहेत. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघाची यांनीही अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात अली लारिजानी यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. खोमेनी यांच्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारिजानी हे इराणमधील महत्त्वाचे नेते होते.
advertisement
इराणच्या सत्ता रचनेत लारिजानी यांची महत्त्वाची भूमिका होती. इराणच्या सुरक्षा धोरणाचे शिल्पकार म्हणून ओळखले जात होते. सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख म्हणून, त्यांनी राजकीय नेतृत्व, लष्कर आणि गुप्तचर यंत्रणा यांच्यात समन्वय साधण्यात आणि युद्धकाळात रणनीती आणि अंमलबजावणी या दोन्हींचे व्यवस्थापन करण्यात एक महत्त्वाची भूमिका बजावली.
इराणकडून जोरदार प्रतिकार सुरू
advertisement
अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात अली खोमेनी मारले गेल्यानंतर इराणमधील राजवट कोसळेल असा अमेरिकेचा कयास होता. मात्र सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूनंतरही इराणकडून तीव्र प्रतिकार केला जात आहे. त्यामुळे अमेरिकेचे अडाखे फोल ठरले आहेत. खोमेनींच्य हत्येनंतर देशात नवी नेतृत्व परिषद तातडीने स्थापन करण्यात आली आणि सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेसारख्या संस्थांकडे सत्ता वेगाने हस्तांतरित करण्यात आली. त्यामुळं खोमेंनीच्या मृत्यूच्या धक्क्यानंतरही इराणच्या लष्करी कारवायात खंड पडला नाही. आजही इराणकडून जोरदार प्रतिकार सुरू आहे.
advertisement
इराणने इस्रायल आणि अमेरिकेला जेरीस आणलं
आखातातील अमेरिकेच्या तळांना आणि इस्रायलमधील शहरांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ला करत इराणने इस्रायल आणि अमेरिकेला जेरीस आणलं आहे. अशातच इराणचे शक्तीशाली नेते असलेल्या अली लारिजानी यांच्या मृत्यूमुळं इराणला मोठा धक्का बसल्याचा दावा केला जात आहे. मात्र इराण मजबूत असल्याचा दावा अब्बास अरिघाची यांनी केला आहे. इराणच्या आयआरजीसी म्हणजे इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉप्सनंही हत्येचा बदला घेण्याचा इशारा दिला आहे.
advertisement
हत्येनंतर युद्धाची गणित बदलतात का?
इराणने इस्रायलवर मिसाईलने जोरदार हल्ले केला...तेल अवीववर इराणने मिसाईलचा वर्षावर केला आहे. खोमेनीनंतर लारीजानींच्या मृत्युमुळं इराणला अधिक मोठा धक्का बसला आहे, कारण देशाच्या प्रतिकाराचा केंद्रबिंदू तेच होते. युद्धकाळात, प्रतिकात्मक नेतृत्वापेक्षा निर्णयक्षमता अधिक महत्त्वाची असते, आणि म्हणूनच लारीजानींची भूमिका अधिक महत्त्वपूर्ण होती. आता त्याच्या हत्येनंतर युद्धाची गणित बदलतात का याकडे लक्ष असणार आहे...
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 9:00 PM IST








