advertisement

पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवा स्कॅम, T20 वर्ल्ड कपमध्ये दोन दिग्गजांनी टीमलाच 'धोका' दिला!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये नव्या स्कॅमने डोकं वर काढलं आहे. पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये त्यांच्याच टीममधल्या दोन दिग्गज खेळाडूंनी धोका दिल्याचा रिपोर्ट समोर आला आहे.

पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवा स्कॅम, T20 वर्ल्ड कपमध्ये दोन दिग्गजांनी टीमलाच 'धोका' दिला!
पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवा स्कॅम, T20 वर्ल्ड कपमध्ये दोन दिग्गजांनी टीमलाच 'धोका' दिला!
कराची : टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचं आव्हान सुपर-8 स्टेजलाच संपुष्टात आलं, त्यानंतर पाकिस्तानच्या टीमवर त्यांचे क्रिकेट चाहते आणि माजी क्रिकेटपटूंनी सडकून टीका केली. टी-20 वर्ल्ड कपमधल्या खराब कामगिरीनंतर बांगलादेशविरुद्धच्या वनडे सीरिजमधून पाकिस्तानने बाबर आझमला डच्चू दिला. आता टी-20 वर्ल्ड कपवेळी पाकिस्तान क्रिकेटमध्ये झालेला नवा फ्रॉड समोर आला आहे.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये निवड झालेले बाबर आझम आणि फखर झमान हे दोन्ही खेळाडू पूर्णपणे फिट नव्हते, असा मेडिकल रिपोर्ट पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या मेडिकल पॅनलने दिला आहे. बाबर आणि फखर टी-20 वर्ल्ड कपआधी त्यांच्या दुखापतीतून पूर्णपणे बरे झाले नव्हते, असा धक्कादायक खुलासा मेडिकल पॅनलने केला आहे. या प्रकरणी पाकिस्तानचे सीनियर सिलेक्टर आकिब जावेद यांनीही मागच्या आठवड्यात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित केले होते आणि निवड प्रक्रियेच्या तपासणीची मागणी केली होती.
advertisement

टी-20 वर्ल्ड कपनंतर तपासणी

यूकेचे स्पोर्ट्स फिजियोथेरपिस्ट डॉ. जावेद मुगल यांनी वर्ल्ड कपनंतर दोन्ही खेळाडूंची तपासणी केली आणि चिंता व्यक्त केली, अशी माहिती पीसीबीच्या सूत्रांनी दिली आहे. जानेवारी महिन्यापासून बाबर आझम आणि फखर झमान पाकिस्तान टीमच्या सोबत आहेत.

बाबरचा स्थानिक टी-20 लीग खेळायला नकार

बाबर आझमने टी-20 वर्ल्ड कपमधून परत आल्यानंतर हॅमस्ट्रिंग दुखापतीचं कारण देऊन नॅशनल टी-20 चॅम्पियनशीप खेळायला नकार दिला. तर दुसरीकडे फखर झमानही बऱ्याच काळापासून दुखापतींचा सामना करत आहे.
advertisement
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तपासणीमध्ये बाबर आझमची दुखापत सुरूवातीच्या आकलनापेक्षा जास्त गंभीर निघाली, तर फखर झमानलाही अनेक महिन्यांपासून या दुखापतीमुळे त्रास होत आहे.

फिजियोने दिला ग्रीन सिग्नल

मेडिकल पॅनलने उपस्थित केलेल्या टीम सिलेक्शनच्या प्रश्नावर पाकिस्तानच्या निवड समितीने हात वर केले आहेत. दोन्ही खेळाडूंना टीममध्ये सामील करण्याच्या आधी टीमचे फिजियो क्लिफ डीकन यांनी फिटनेस क्लियरन्स दिला होता, असं निवड समितीचं म्हणणं आहे. फिजियो डिकन यांचे खेळाडूंसोबत जवळचे संबंध आहेत, त्यामुळे छोटी दुखापत असली तरी डिकन त्यांच्या जवळच्या खेळाडूंना खेळण्याची परवानगी देतात, असा आरोप डिकन यांच्यावर याआधीही झाला आहे.
advertisement

बाबरचं रिहॅब सुरू

बाबर आझम हा सध्या नॅशनल क्रिकेट अकादमीच्या मेडिकल पॅनलच्या देखरेखीखाली आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर झाल्मी बाबर आझमला कर्णधार करण्याची शक्यता आहे. 26 मार्चपासून पीएसएलला सुरूवात होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवा स्कॅम, T20 वर्ल्ड कपमध्ये दोन दिग्गजांनी टीमलाच 'धोका' दिला!
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement