Mumbai-Goa Highway: आता सुस्साट सुटायचं! मुंबई - गोवा महामार्ग वर्षअखेर होणार खुला, कशेडी घाटात..
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai-Goa Highway: मुंबई – गोवा महामार्ग 2025 मध्ये वाहतुकीसाठी खुला होणार आहे. कशेडी बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात असून एप्रिल अखेर येथून वाहतूक सुरू होईल.
मुंबई: गेल्या 13 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला वेग मिळाला असून सरकारने डिसेंबर 2025 पर्यंत संपूर्ण महामार्ग खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार आणि इतर सदस्यांनी महामार्गाच्या रखडलेल्या कामांबाबत शुक्रवारी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर सार्वजनिक बांधकाम विभागमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी उत्तर देताना आतापर्यंतच्या कामाविषयी लेखी स्वरूपात माहिती दिली आहे.
13 वर्षांत 15,600 कोटींचा खर्च
मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रलंबित कामांसाठी 13 वर्षांत तब्बल 15,600 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती देण्यात आली आहे. हा महामार्ग राज्यातील एक महत्त्वाचा दुवा असल्याने प्रवाशांसाठी तो लवकरात लवकर सुरू करण्याची गरज आहे.
advertisement
महामार्गाच्या कामाचा आढावा
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे (NHAI) सुरू असलेल्या महामार्गाच्या कामांपैकी 84.60 किमी लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. त्यापैकी पनवेल ते कासू (42.3 किमी) या मार्गावरील मोठे पूल व उड्डाणपुलांचे काम मार्च 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. तर कासू ते इंदापूर (42.3 किमी) या मार्गावरील पूल व उड्डाणपुलांचे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
advertisement
कशेडी बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात
कशेडी घाटातील चौपदरीकरण प्रकल्पात दोन बोगद्यांचा समावेश आहे. त्यापैकी एक बोगदा पूर्ण झाला असून त्याद्वारे वाहतूक सुरू आहे. उर्वरित दुसऱ्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात असून तो मार्च 2025 पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
डिसेंबर 2025 पर्यंत महामार्ग खुला
राज्य सरकारने डिसेंबर 2025 पर्यंत संपूर्ण महामार्ग सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. रखडलेल्या या प्रकल्पामुळे प्रवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, काम वेगाने सुरू असून 2025 पर्यंत हा महामार्ग प्रवाशांसाठी खुला होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 08, 2025 9:28 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai-Goa Highway: आता सुस्साट सुटायचं! मुंबई - गोवा महामार्ग वर्षअखेर होणार खुला, कशेडी घाटात..







