Mumbai Local: मुंबईकरांनो वेळापत्रक पाहून बाहेर पडा, काही ट्रेन रद्द तर काही उशिराने, मध्य-हार्बर मार्गावर विकेण्डला मेगाब्लॉक
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Local: वीकेंडला मुंबईकरांना लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं लागणार आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर ब्लॉक घेण्यात येणार असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई: मुंबकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वीकेंडला लोकलने बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर आधी वेळापत्रक पाहावं लागणार आहे. या विकेंडला मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा – मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी / वांद्रे दरम्यान मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. तर पश्चिम रेल्वे वसई रोड ते भाईंदर दरम्यान शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेणार आहे. या काळात रेल्वे रुळांसह सिग्नल यंत्रणेची देखभाल करण्यात येणार असून त्यासाठी काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही विलंबाने धावणार आहेत.
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात अप-डाउन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप-डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ठाण्याच्या पलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर पुन्हा अप-डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे लोकल फेऱ्या 15 ते 20 मिनिटे विलंबाने धावणार असून काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
advertisement
हार्बर मार्गावर लोकल रद्द
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांदेर दरम्यान अप आणि डाउन मार्गावर रविवारी सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.40 या काळात हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक काळात सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल दरम्यान आणणि सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव दरम्यान धावणाऱ्या अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. तसेच ब्लॉक काळात पनवेल – कुर्ला – पनवेल दरम्यान विशेष फेऱ्या चालवल्या जातील.
advertisement
पश्चिम रेल्वेवर ब्लॉक
पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री वसई रोड आणि भाईंदर मार्गावर अप आणि डाउन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक वेळेत अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल विरार ते भाईंदर /बोरिवलीदरम्यान अप णि डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येमार आहेत. ब्लॉकमुळे रात्री उशिराने धावणाऱ्या गाड्या विलंबाने धावतील. रात्रकालीन ब्लॉक असल्यामुळे पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक असणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 08, 2025 7:50 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: मुंबईकरांनो वेळापत्रक पाहून बाहेर पडा, काही ट्रेन रद्द तर काही उशिराने, मध्य-हार्बर मार्गावर विकेण्डला मेगाब्लॉक








