Mumbai Local: मध्य रेल्वेवर फर्स्ट क्लासमधून प्रवास करताय? उद्यापासून ही घ्या काळजी अन्यथा....

Last Updated:

Mumbai Local: विनातिकीट प्रवाशांना आवर घालण्यासाठी मध्य रेल्वे सातत्याने मोहीम राबवत असते. आता प्रथम श्रेणीतून अवैध प्रवास करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई मोहीम हाती घेण्यात आलीये.

Mumbai Local: मध्य रेल्वेवर फर्स्ट क्लासमधून सोमवारपासून प्रवास करणार असाल तर, बातमी तुमच्यासाठी!
Mumbai Local: मध्य रेल्वेवर फर्स्ट क्लासमधून सोमवारपासून प्रवास करणार असाल तर, बातमी तुमच्यासाठी!
मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरी रेल्वेमधील प्रथम श्रेणी डब्यांतील वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. सोमवार, 16 जूनपासून ‘केंद्रीत तिकीट तपासणी मोहमी’ सुरू करण्यात येणार आहे. लोकल प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा आणि त्यांचना योग्य तिकीट घेऊन प्रवास करता यावा, यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे विनातिकट प्रथम श्रेणी प्रवास करणाऱ्यांवर आता थेट कारवाई होणार आहे.
वातानुकूलित रेल्वेत तपासणी मोहीम
विनातिकीट प्रवाशांना आवर घालण्यासाठी मध्य रेल्वे सातत्याने मोहीम राबवत असते. यापूर्वी वातानुकूलित लोकलमध्ये अशाच प्रकारची तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली होती. हेल्पलाइन तिकीट तपासणी उपक्रमात मोठ्या प्रवाणावर विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर प्रथम श्रेणी डब्यात देखील ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
advertisement
लोकलच्या प्रथम श्रेणीतून विनातिकीट प्रवास
लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये अनधिकृत प्रवासाच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत. यामुळे मुंबई विभागाचे विशेत तिकीट तपासणी पथक रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱअयांसह विशेष मोहीम हाती घेणार आहे. अनधिकृत प्रवाशी आढळल्यास त्यांच्यावर तत्काळ प्रवासातच दंड आकारण्यात येणार आहे. दंड भरण्यास नकार दिल्यास अशा प्रवाशांना पुढील स्थानकावर उतरवून स्थानिक तिकीट तपासणीसांकडे सोपवले जाईल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: मध्य रेल्वेवर फर्स्ट क्लासमधून प्रवास करताय? उद्यापासून ही घ्या काळजी अन्यथा....
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement