अस्सल लोकरीचं घोंगडं अन् लाकडी लाटणं डोळ्यासमोर घ्या करुन...मुंबईत माणदेशी महोत्सवात शेवटची संधी!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Nikita Tiwari
Last Updated:
Mandeshi Mahotsav: मुंबईत प्रसिद्ध माणदेशी महोत्सव सुरू आहे. याठिकाणी अस्सल लोकरीचं घोंगडं आणि लाकडी लाटणं पाहिजे तसं बनवून घेता येतं.
निकिता तिवारी, प्रतिनिधी
मुंबई: सध्या मुंबईत माणदेशी महोत्सव सुरू आहे. परळ मधील नरे पार्क या मैदानात 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी हा महोत्सव होत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळे लघुउद्योग आणि बचत गट या महोत्सवात सामील झाले आहेत. या महोत्सवात आपल्याला साताऱ्याचे लाकडी हस्त कलाकार देखील दिसत आहेत. लाकडापासून बनवलेल्या विविध वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होतेय.
advertisement
लाकडी हस्त कलाकार यांच्याकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची लाटणी पाहायला मिळतात. ॲक्युप्रेशर लाटणं, छास घुसळण्याचे लाटणे, चपाती पलटण्यासाठी वापरला जातो तो पलीता, वेगवेगळ्या प्रकारचे नॉनस्टिकची लाटणे, लिंबू पिळण्याचे लाकडाचे भांडे तसेच आलं आणि लसूण ठेचण्यासाठी बनवले गेलेले लाकडी लाटणे, असे वेगवेगळ्या प्रकार तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला इथे लाटणे बनवण्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं आणि ती कला बघण्याची फार दुर्मिळ संधी या महोत्सवात लाभते.
advertisement
कसं बनतं लाटणं?
माणदेशी महोत्सवात साताऱ्यातील कलाकार लाकडापासून लाटणे बनवण्याचं काम करत आहे. लाकडापासून बनवलेल्या साच्यात लाटणं बनवण्याचे लाकूड ठेवले जाते. एका बाजूने एक व्यक्ती त्या लाकडाला लाटण्याचा आकार देत असते तसेच दुसऱ्या बाजूने दुसरी व्यक्ती ते लाटणं फिरवण्याचा काम करत असते.
advertisement
साताऱ्याचे हस्तकलाकार गटाने आतापर्यंत फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात वेगवेगळे प्रदर्शनात भाग घेतला आहे. सर्व प्रदर्शनांमध्ये ते लाटणं बनवण्याचे प्रात्यक्षिक सादर करत असतात. त्यांना महाराष्ट्रभरातून नाही तर देशभरातून लाकडाच्या वस्तूंसाठी ऑर्डर येत असतात. पण ते कोणत्याही प्रकारचा ऑनलाइन बिजनेस करत नाहीत. जर तुम्हाला त्यांच्याकडून विकत घ्यायचं असेल तर तुम्हाला त्यांच्या दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा लागतो. ऑर्डर नुसार ते लाटणं घरपोच करतात, अशी माहिती लाटणं विक्रेत्यांनी दिली.
advertisement
अस्सल लोकरीचं घोंगडं
माणदेशी महोत्सवात माणदेशातील विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ देखील मिळतात. अस्सल लोकरीचं घोंगडं इथं आपल्या डोळ्यासमोर बनवून दिलं जातं. त्यामुळे अशा वस्तू खरेदीसाठी मुंबईकर मोठी गर्दी करतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 08, 2025 1:18 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
अस्सल लोकरीचं घोंगडं अन् लाकडी लाटणं डोळ्यासमोर घ्या करुन...मुंबईत माणदेशी महोत्सवात शेवटची संधी!