Mumbai Pune Expressway : विकेंडच्या नादात बाहेर पडूच नका! लोणावळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी, 3 किमीपर्यंत वाहनांच्या लांब रांगा

Last Updated:

Mumbai Pune Expressway : लोणावळ्याजवळील अमृतांजन ब्रिज ते खोपोली एक्झिट या दरम्यान सुमारे 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

News18
News18
लोणावळा, प्रतिनिधी अनिस शेख: तुम्ही मुंबई पुणे प्रवास करणार असाल किंवा विचार असेल तर आताच थांबा, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. विकेंडच्या सुट्ट्यांमुळे आणि आळंदीच्या कार्तिकी यात्रेसाठी निघालेल्या भाविकांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज प्रचंड मोठी वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. अनेक प्रवासी कोंडीत अडकले आहेत.
3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
गुलाबी थंडी सुरू झाली आहे, त्यामुळे या थंडीचा आनंद घेण्यासाठी आणि फिरण्यासाठी बरेच लोक बाहेर पडत आहेत. घाटातून दाट धुकं पाहण्यासाठी लोक लोणावळ्यात जात आहेत. त्यामुळे घाटात वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. लोणावळ्याजवळील अमृतांजन ब्रिज ते खोपोली एक्झिट या दरम्यान सुमारे 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विकेंडचा आनंद लुटण्यासाठी पर्यटनस्थळी निघालेल्या पर्यटकांना या कोंडीचा मोठा फटका बसला आहे.
advertisement
विकेण्डला बाहेर पडाल तर अडकाल
या कोंडीमुळे केवळ पर्यटकच नव्हे, तर आळंदी येथील कार्तिकी यात्रेसाठी निघालेले भाविक देखील रस्त्यात अडकले आहेत, ज्यामुळे त्यांच्या प्रवासात मोठी अडचण निर्माण झाली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलीस तातडीने एक्स्प्रेस वेवर दाखल झाले आहेत. पोलीस वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असून, प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विकेंडला सहसा होणारी ही वाहतूक कोंडी, प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरली आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Pune Expressway : विकेंडच्या नादात बाहेर पडूच नका! लोणावळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी, 3 किमीपर्यंत वाहनांच्या लांब रांगा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement