Mumbai : दोन दिवस पाण्याचा ठणठणाट! मुंबईतील 3 मोठ्या विभागात पाणीपुरवठा बंद; तुमच्या भागाचा समावेश आहे का?
Last Updated:
Mumbai Water Cut News : मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे धारावी आणि भांडुप परिसरात आज शिवाय उद्या पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. घाटकोपरमध्ये कमी दाबाने पाणी मिळणार असून नागरिकांनी पाण्याचा साठा करून काळजी घ्यावी.
मुंबई : मुंबईतील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई शहरातील तीन महत्त्वाच्या उपनगरीय शहरात आज आणि उद्या पाणी पुरवठा बंद असणार आहे. नेमका हा पाणीपुरवठा का बंद केला जाणार आहे आणि कोणत्या कोणत्या भागांना याचा फटका बसणार आहे, याबाबत जाणून घ्या.
आज आणि उद्या पालिकेकडून पाणी कपात जाहीर
मुंबईत मेट्रो 7 अ प्रकल्पाच्या कामासाठी जलवाहिनीचे काम 'के पूर्व' विभागात आजपासून ते गुरुवार 22 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईतील काही विभागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून काही भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
जी उत्तर विभाग
जी उत्तर विभागातील धारावी परिसरात जस्मिन मिल मार्ग, माटुंगा कामगार वसाहत, संत रोहिदास मार्ग, 60 फूट आणि 90 फूट मार्ग, संत कक्कैया मार्ग, एम. पी. नगर, ए. के. जी. नगर, धारावी मुख्य मार्ग, माहीम फाटक आदी भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
advertisement
के पूर्व विभाग
के पूर्व विभागातील मुलगाव डोंगरी, एमआयडीसी, कोंडिविटा, मरोळ, जे. बी. नगर, चकाला, विमानतळ परिसर, बामणवाडा, पारसीवाडा, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी. अँड टी. कॉलनी आदी भागांत दोन्ही दिवस पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. काही भागांत बुधवारी तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
एस विभाग
एस विभागात विक्रोळी-कांजूरमार्ग परिसर, भांडुप (पश्चिम), कोकण नगर, काजू टेकडी, टेंभीपाडा, शास्त्रीनगर, जयधिम नगर, पाधपोली गाव आदी भागांत काही ठिकाणी कमी दाबाने तर काही ठिकाणी पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहील. आरे मार्ग परिसरात दोन दिवस सकाळपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाणी मिळणार नाही.
advertisement
एच पूर्व
एच पूर्व विभागातील संपूर्ण बीकेसी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. एन विभागात विक्रोळी पश्चिम, गोदरेज कुंपण, कैलास संकुल, सागर नगर आदी भागांत ठरावीक वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 8:47 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : दोन दिवस पाण्याचा ठणठणाट! मुंबईतील 3 मोठ्या विभागात पाणीपुरवठा बंद; तुमच्या भागाचा समावेश आहे का?









