Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 'या' विभागांमध्ये १२ दिवस १० टक्के पाणीकपात
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
बृहन्मुंबई महानगर पालिकेमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम’च्या वार्षिक परिक्षणाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पुढच्या 10 ते 12 दिवस मुंबई उपनगरांत नागरिकांवर पाणीकपातीचे संकट राहणार आहे.
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम’च्या वार्षिक परिरक्षणाचे काम हाती घेतले जाणार आहे. हे कामकाज मंगळवार, दिनांक २७ जानेवारी २०२६ पासून शनिवार, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत नियोजित आहे. त्यामुळे शहर विभाग आणि पूर्व उपनगरांतील बहुतेक प्रशासकीय विभागांचा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. या कालावधीत शहर विभाग व पूर्व उपनगरांमध्ये १० टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे.
तसेच ठाणे व भिवंडी महानगरपालिकेच्या हद्दीतील ज्या भागास बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा होतो त्या भागांमध्ये देखील ही १० टक्के पाणीकपात लागू राहणार आहे.
प्रभावित विभागांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
शहर:
१. ‘ए’ विभाग - नेव्हल डॉकयार्ड क्षेत्र
२. ‘बी’ विभाग - संपूर्ण विभाग
३. ‘सी’ विभाग - भेंडी बाजार, बोहरी मोहल्ला, घोगरी मोहल्ला क्षेत्र
advertisement
४. ‘ई’ विभाग - पूर्ण विभाग
५. ‘एफ दक्षिण’ विभाग - संपूर्ण विभाग
६. ‘एफ उत्तर’ विभाग - संपूर्ण विभाग
पूर्व उपनगरे:
१. ‘टी’ विभाग - मुलुंड (पूर्व) आणि (पश्चिम) क्षेत्र
२. ‘एस’ विभाग - भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी (पूर्व) क्षेत्र
३. ‘एन’ विभाग - विक्रोळी, घाटकोपर (पूर्व), घाटकोपर
advertisement
४. ‘एल’ विभाग - कुर्ला (पूर्व) क्षेत्र
५. ‘एम पूर्व’ विभाग – संपूर्ण विभाग
६. ‘एम पश्चिम’ विभाग – संपूर्ण विभाग
संबंधित परिसरांमधील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे. तसेच, महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 3:48 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 'या' विभागांमध्ये १२ दिवस १० टक्के पाणीकपात








