Navi Mumbai Airport: नवी मुंबईचं विमानतळ हवाई सेवेसाठी सज्ज, पहिलं उड्डाण कधी?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
Navi Mumbai Airport: देशातील पहिले ग्रीन फिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई सेवेसाठी सज्ज झालंय. या विमानतळावरून लवकरच व्यावसायिक उड्डाणं सुरू होणार आहेत.
नवी मुंबई: देशातील पहिले ग्रीन फिल्ड आतंरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी आणि नवी मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले नवी मुंबई विमानतळ आता लोकांना सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहे. सध्या विमानतळाचे काम पूर्णत्वास आले आहे. त्यानुसार येत्या 17 एप्रिल रोजी विमानतळ व्यावसायिक वापरासाठी खुले करण्याची योजना आखण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विमानतळ प्रकल्पाला भेट देत आढावा घेतला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून विमानतळाचा विकास केला जात आहे. या प्रकल्पावर सिडको नोडल एजन्सी म्हणून काम करत आहेत. गेल्या वर्षभरात अनेक आवश्यक चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. सिडकोतर्फे 1160 हेक्टरवर विकसित करण्यात आलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रती वर्ष 20 दशलक्ष प्रवासी आणि 0.8 दशलक्ष टन माल वाहतुकीकरिता नियोजित आहे. अंतिम टप्प्यात विमानतळाची प्रती वर्ष प्रवासी वाहतूक क्षमता 90 दशलक्ष आणि माल वाहतूक क्षमता 2.6 दशलक्ष टन असणार आहे.
advertisement
या दिवशी पहिलं व्यावसायिक उड्डाण
विमानाचे टेक ऑफ आणि लॅण्डिंगचीही चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्यानुसार 17 एप्रिलपासून नवी मुंबई विमानतळ व्यावसायिक वापरासाठी खुले करण्याची योजना आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष विपिन कुमार आणि 3 नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे संचालक फैज अहमद किडवई यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत विमानतळाच्या कामांचा दिवसभर आढावा घेतला. यावेळी नागरी विमान वाहतूक सुरक्षा मंडळाचे प्रादेशिक संचालक प्रकाश 3 निकम, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल आदी उपस्थित होते.
advertisement
मूल्यमापन चाचणी
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय ही देशातील प्रमुख विमानतळ सुरक्षा नियामक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून विमानतळाचे व्यापक मूल्यमापन करण्यात आले.विमानतळाच्या धावपट्टी, एप्रन, टॅक्सी वे, एटीसी टॉवर टर्मिनल बिल्डिंग, बॅगेज हँडलिंग सिस्टीम आदी सुविधांचा यावेळी आढावा घेण्यात आला.
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
February 28, 2025 12:09 PM IST