मुंबई ते गोवा फक्त साडेसहा तासांत! लवकरच RoPAX सेवा, आता कारसह करायचा समुद्र प्रवास

Last Updated:

Mumbai – Goa RoPAX: मुंबई ते गोवा प्रवास समुद्र मार्गानं आता फक्त साडेसहा तासांत करता येणार आहे. विशेष म्हणजे मुंबईकरांना आपली गाडी घेऊन समुद्रमार्गे गोव्याला जाता येणार आहे.

मुंबई ते गोवा फक्त साडेसहा तासांत! लवकरच RoPAX सेवा, आता कारसह करायचा समुद्र प्रवास
मुंबई ते गोवा फक्त साडेसहा तासांत! लवकरच RoPAX सेवा, आता कारसह करायचा समुद्र प्रवास
मुंबई: मुंबईकरांचं एक आगळवेगळं स्वप्न आता साकार होण्याच्या वाटेवर आहे. मुंबईकर लवकरच फेरीने गोव्याला जाऊ शकणार आहेत. विशेष म्हणजे सोबत गाडी देखील घेऊन जाता येणार आहे. मुंबई – गोवा या लोकप्रिय मार्गावर प्रवासाचा हा नवीन मार्ग लवकरच एमटूएम फेरीज द्वारे सादर होणार आहे. ज्यांनी रोपॅक्स जहाज  म्हणजेच प्रवासी आणि वाहने दोन्ही वाहून नेऊ शकणारी रोल-ऑन, रोल-ऑफ पॅसेंजर फेरी खरेदी केली आहे. आता ते मुंबई आणि गोवा दरम्यान चालवण्यासाठी आवश्यक ती परवानगी मिळवण्याच्या प्रक्रियेत आहेत.
मुंबई लगत असणाऱ्या आणि वीकेंडसाठी प्रसिद्ध अशा अलिबागचे प्रवेशद्वार असलेल्या मांडवा दरम्यान दररोज रो-रो (रोल-ऑन, रोल-ऑफ) सेवा चालवली जाते. हीच एमटूएम फेरीज आता मुंबई-गोवा सेवा सुरू करण्याच्या विचारात आहे. “आमचे रोपॅक्स जहाज मुंबई-गोवा प्रवास साडेसहा तासांत पूर्ण करू शकते आणि सोबतच प्रवासी आणि वाहन यांना घेऊन जात सुद्धा प्रवास करता येऊ शकतो,” असं एमटूएम या फेरीजचं म्हणणं आहे.
advertisement
“आमच्याकडे एक नवीन जहाज आहे, जे आम्ही इटलीहून आणले आहे. हे जहाज मुंबईतील ड्राय डॉकमध्ये आहे आणि पुढील महिन्यात ते बाहेर पडेल," असे एमटूएम फेरीजच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी सांगितले की कंपनी मुंबईतील माझगाव येथील फेरी व्हार्फ ते गोव्यातील मोरमुगाव बंदर प्राधिकरण (एमपीए) पर्यंत मुंबई-गोवा रोपॅक्स जहाज सेवा चालवण्याची योजना आखत आहे. ही योजना यशस्वीरित्या पूर्ण झाली तर मुंबईकरांना गोव्यात त्यांच्या प्रायव्हेट गाड्या घेऊन जाता येणार आहेत.
advertisement
620 प्रवासी आणि 60 गाड्या
कंपनीच्या रोपॅक्स जहाजात 620 प्रवासी आणि 60 गाड्या वाहून नेण्याची क्षमता आहे. मुंबई-गोवा रोपॅक्स सेवा ही भारतातील अशा प्रकारची पहिलीच सेवा नाही. गुजरातमधील हजिरा आणि घोघा दरम्यान अशीच एक सेवा चालते, तर एमटूएम फेरीज मुंबईतील फेरी व्हार्फ आणि रायगडमधील मांडवा दरम्यान दिवसातून तीन वेळा ही सेवा चालवते. गोव्यासारख्या ठिकाणी मुंबईकर अनेकदा सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जातात. त्यामुळे रोपॅक्स या जहाजाला परवानगी मिळाली तर अनेक मुंबईकरांसाठी ती आनंदाची पर्वणीच असेल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबई ते गोवा फक्त साडेसहा तासांत! लवकरच RoPAX सेवा, आता कारसह करायचा समुद्र प्रवास
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement