कुत्र्याला वाचवायला गेला अन् घात झाला, मित्रांसोबत लोणावळ्याला निघालेल्या तरुणाचा मृत्यू

Last Updated:

Dog Accident: मित्रांसह मुंबईहून लोणावळ्याला निघालेल्या तरुणाचा करुण अंत झाला. महामार्गावर दुचाकीला आडवा आलेल्या कुत्र्याला वाचवताना अपघात झाला.

कुत्र्याला वाचवायला गेला अन् घात झाला, मित्रांसोबत लोणावळ्याला निघालेल्या तरुणाचा मृत्यू
कुत्र्याला वाचवायला गेला अन् घात झाला, मित्रांसोबत लोणावळ्याला निघालेल्या तरुणाचा मृत्यू
पनवेल: प्राण्यांमुळे होणाऱ्या रस्ते अपघातांचे प्रमाण चिंताजनक आहे. अशीच काहीशी घटना पनवेल परिसरात घडली असून 20 वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला आहे. समोर अचानक कुत्रा आडवा आल्याने मोटरसायकल घसरून हा अपघात घडला. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलिस ठाण्यात झाली असून कुशल मनोज सोनकर (वय 20, रा. गोपाळनगर, वरळी, मुंबई) असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 2 नोव्हेंबर रोजी कुशल सोनकर, मितेश ढवळे आणि आणखी पाच मित्र मोटरसायकलवरून लोणावळा येथे फिरण्यासाठी गेले होते. सर्वजण जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून जात असताना बारवई गावाजवळ हा अपघात झाला. कुशल आपल्या मोटरसायकलवरून पुढे चालला होता. अचानक रस्त्यावर कुत्रा आडवा आल्याने त्याने त्याला वाचवण्यासाठी तातडीने ब्रेक लावले. मात्र मोटरसायकल घसरली आणि तो जोरात रस्त्यावर आदळला आणि जखमी होऊन जागेवरच मृत पावला.
advertisement
या घटनेमुळे मित्रपरिवार आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तरुण वयात कुशलचा अशा प्रकारे झालेला मृत्यू सर्वांना हादरवून गेला आहे. पनवेल पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येबाबतही चिंता व्यक्त केली आहे. अशा घटनांमुळे वाहनचालक आणि पादचारी या दोघांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कुशल सोनकर याच्या आकस्मिक निधनामुळे वरळी परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघाताने पुन्हा एकदा रस्त्यांवरील प्राण्यांमुळे होणाऱ्या दुर्घटनांबाबत जागरूकतेची गरज अधोरेखित झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
कुत्र्याला वाचवायला गेला अन् घात झाला, मित्रांसोबत लोणावळ्याला निघालेल्या तरुणाचा मृत्यू
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement