

भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर 40 फिट कंटेनर मुख्य रस्त्यावर पलटी झाला. 3 किलोमिटर पर्यंत वाहतूक कोंडी झाल्याचे समोर आले. समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कार चालकाला वाचवण्याचा नादात हा अपघाच झाला आणि त्यामुळे कंटेनर पलटी झाला.अनेक वाहने अडकली असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस यंत्रणा दाखल झाली.कंटेनर चालक रामानंद यादव किरकोळ जखमी झाला आहे.









