बाबा सिद्दिकी गोळीबार प्रकरणाचं बिश्नोई कनेक्शन समोर, मात्र पोलिसांना वेगळाच संशय

Last Updated:

या प्रकरणाचं लॉरेन बिश्नोई कनेक्शन समोर आलं आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली आहे.

News18
News18
मुंबई, प्रिती सोमपुरा, प्रतिनिधी : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबा सिद्दिकी यांच्यावर शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. सिद्दिकी हे आपला मुलगा आणि आमदार जिशान सिद्दिकी यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यलयात आले होते. याचवेळी ही घटना घडली. या घटनेत बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला आहे. गोळीबारानंतर पळून जाण्याच्या तयारीत असताना दोन आरोपींना पोलिसांनी पकडलं, मात्र एक आरोपी गर्दीचा फायदा घेऊन पसार झाला.
या प्रकरणाचं लॉरेन बिश्नोई कनेक्शन समोर आलं आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली आहे. 'ही लढाई व्हावी, अशी आमची इच्छा नव्हती पण तू आमच्या भावाचे नुकसान केले,' असे समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीने अभिनेता सलमान खान याला उद्देशून म्हटले आहे. अनुज थापन याचा बदला घेण्याकरिता बाबा सिद्धिकी यांची हत्या करण्यात आली आहे, असा दावा सोशल मीडियावरील लिहिलेल्या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
advertisement
दरम्यान या प्रकरणाचं जरी लॉरेन्स बिश्नोई कनेक्शन समोर आलं असलं तरी देखील पोलीस या प्रकरणाचा वेगवेगळ्या अँगलने तपास करत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणात जरी लॉरेन्स बिश्नोईचा अँगल नाकारला नसला तरी देखील विविध अँगलने तपास सुरू आहे. तपासाची दिशा भरकटवण्यासाठी देखील हे कारस्थान असू शकतं असं पोलिसांना वाटत आहे. बांधकाम व्यवसायातील शत्रूत्वाचा अँगल देखील या प्रकरणात पोलिसांकडून तपासला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
बाबा सिद्दिकी गोळीबार प्रकरणाचं बिश्नोई कनेक्शन समोर, मात्र पोलिसांना वेगळाच संशय
Next Article
advertisement
Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement