मुंबईत बारमध्ये खुलेआम सौदा, बारगर्ल्सला ग्राहकांसोबत शरीरसंबंधासाठी पाडलं जायचं भाग, 8 जणींची सुटका
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
चेंबूरच्या प्रमिला बारमध्ये सेक्स रॅकेट उघड, RCF आणि नेहरुनगर पोलिसांची कारवाई, दोन मॅनेजर अटकेत, आठ तरुणींची सुटका, मालक वसंत चंद्रशेखर रेड्डी फरार.
मुंबई: मुंबईच्या चेंबूर येथील वाशीनाका परिसरात एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. येथील एका 'प्रमिला बार' नावाच्या बारमध्ये हे रॅकेट सुरू होतं. आरसीएफ (RCF) आणि नेहरुनगर पोलिसांनी संयुक्तपणे ही धडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी बारमधील दोन मॅनेजरना अटक केली असून, या रॅकेटमध्ये अडकलेल्या आठ तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
निशिकांत सदानंद साऊ आणि अताऊ रेहमान अब्दुल खालिद अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. पण बारचा मालक वसंत चंद्रशेखर रेड्डी फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. अटक केलेल्या आरोपींकडे पोलिसांनी चौकशी केली असता बारमध्ये अनैतिक व्यवसाय आणि देहविक्रीचा धंदा चालत असल्याचे उघड झालं आहे.
नेमकी कारवाई कशी केली?
advertisement
संबंधित बारमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अत्यंत गुप्त पद्धतीने कारवाईची योजना आखली. सर्वप्रथम, पोलिसांनी एका बोगस ग्राहकाच्या (Dummy Customer) मदतीने बारमधील परिस्थितीची शहानिशा केली. तेव्हा हे स्पष्ट झाले की बारचे दोन्ही मॅनेजर तिथे काम करणाऱ्या बारगर्लना ग्राहकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त करत होते.
देहविक्रीचा अर्धा पैसा बारच्या गल्ल्यात
advertisement
देहविक्रीच्या व्यवहारात पैशांची वाटणी निश्चित करण्यात आली होती. ग्राहकाकडून मिळालेली एकूण रक्कम दोन भागांत विभागली जात होती - त्यापैकी अर्धी रक्कम थेट बारच्या गल्ल्यात जमा होत होती, तर उर्वरित अर्धी रक्कम संबंधीत बारगर्लला दिली जात होती.
आठ तरुणींची सुटका
बनावट ग्राहकाकडून निश्चित सिग्नल मिळताच आरसीएफ आणि नेहरुनगर पोलिसांच्या संयुक्त पथकाने बारवर तत्काळ छापा टाकला. या छाप्यामुळे बारमध्ये उपस्थित लोकांमध्ये मोठी पळापळ झाली. पोलिसांनी तत्काळ दोन्ही मॅनेजरना अटक केली आणि आठ तरुणींना त्यांच्या तावडीतून सोडवले.
advertisement
मुख्य सूत्रधार बारमालक फरार
दरम्यान, या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार आणि बारचा मालक वसंत चंद्रशेखर शेट्टी मात्र पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो सध्या फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांनी मॅनेजरविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 07, 2025 7:29 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईत बारमध्ये खुलेआम सौदा, बारगर्ल्सला ग्राहकांसोबत शरीरसंबंधासाठी पाडलं जायचं भाग, 8 जणींची सुटका