RailOne अ‍ॅपवरून तिकीट बुक करा अन् थेट 3% डिस्काउंट मिळवा; सुविधा कधीपर्यंत?

Last Updated:

RailOne Railway Ticket Booking Discount: RailOne App वापरून ट्रेन तिकीट बुक करा आणि मिळवा 3 टक्के कॅशबॅक. ही सुविधा 14 जानेवारी ते 14 जुलै 2026 पर्यंत उपलब्ध आहे.

News18
News18
मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता ट्रेनचं तिकीट बुक करताना प्रवाशांना थेट पैसे वाचवण्याची संधी मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने नवीन रेलवन अॅप सुरू केलं असून या अॅपवरून तिकीट बुक केल्यास प्रवाशांना 3 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. पण ही सुविधा कधीपासून ते किती तारखेपर्यंत मिळणार आहे याबाबत जाणून घ्या
रेलवन अ‍ॅपवरून तिकीट बुक करा आणि मिळवा थेट 3% डिस्काउंट
आतापर्यंत प्रवाशांना आर-वॉलेटद्वारे पेमेंट केल्यासच 3 टक्के सूट मिळत होती. मात्र आता रेलवन अॅपवरून तिकीट बुक केल्यासही हा फायदा मिळणार आहे. विशेष म्हणजे आर-वॉलेटवरील सध्याचा 3 टक्के डिस्काउंट कायम राहणार असून त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.ही सुविधा १४ जानेवारी २०२६ पासून सुरू झाली असून १४ जुलै २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.
advertisement
अवघ्या काही मिनिटांत तिकीट बुक करा
रेलवन अॅपवरून अनारक्षित तिकीट बुक करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. सर्वप्रथम रेलवन अॅप डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर IRCTC किंवा UTS आयडीच्या मदतीने लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर होम स्क्रीनवर अनारक्षित तिकीट हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून प्रवासासाठी आवश्यक स्टेशन, तिकीटाचा प्रकार आणि प्रवाशांची संख्या निवडायची आहे.
advertisement
यानंतर ऑनलाइन पेमेंट केल्यावर तिकीट बुक होईल आणि ते अॅपमध्येच सेव्ह करता येईल. ऑनलाइन माध्यमातून पेमेंट करणाऱ्या प्रवाशांनाच या कॅशबॅक योजनेचा लाभ मिळणार आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ही योजना यशस्वी ठरल्यास भविष्यातही हा डिस्काउंट कायम ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे रोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही योजना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
RailOne अ‍ॅपवरून तिकीट बुक करा अन् थेट 3% डिस्काउंट मिळवा; सुविधा कधीपर्यंत?
Next Article
advertisement
BMC Election Voting Marker : मतदानाची शाई एका मिनिटात गायब! मुंबई, कल्याण ते पुणे सगळीकडे गोंधळ, उमेदवार धास्तावले, नेमका प्रकार काय?
मतदानाची शाई एका मिनिटात गायब! मुंबई, कल्याण ते पुणे सगळीकडे गोंधळ, उमेदवार धास्
  • मतदान करणाऱ्या मतदारांच्या बोटांवर लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याचा प्रकार

  • मुंबई, ठाणे ते पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्येही मार्करच्या शाईने घोळ घातला

  • शाई पुसली जात असल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे.

View All
advertisement