राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका; कदमांचा जोरदार पलटवार, म्हणाले स्पष्ट बोलणारा नेता पण..
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
रामदास कदम यांनी राज ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे, निवडणुका जवळ आल्या की प्रत्येक गोष्टीत टीका करणं गरजेचं नसंत असं कदम यांनी म्हटलं आहे.
रत्नागिरी, शिवाजी गोरे, प्रतिनिधी : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. यावरून आता शिवसेना नेते रामदास कदम यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. राज ठाकरे यांच्यात आम्ही बाळासाहेब पाहतो, ते स्पष्ट बोलतात. राज ठाकरे यांनी चांगल्याला चांगलं म्हणायला शिकलं पाहिजे. निवडणुका जवळ आल्या की प्रत्येक गोष्टीत टीका करणे गरजेचे नसते. स्पष्ट बोलणारा नेता ही आपली ओळख राज ठाकरे यांनी जपावी, असा टोला कदम यांनी लगावला आहे.
दरम्यान यावेळी बोलताना कदम यांनी काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर देखील जोरदार टीका केली. काँग्रेसच्या गरीबी हटाव घोषणेच काय झालं हे काँग्रेसने सांगावं? असा सवाल कदम यांनी केला आहे. पुढे बोलतना ते म्हणाले की, निवडणुका आल्या की फक्त वारेमाप घोषणा द्यायच्या आणि अंमलबजावणी शुन्य, हे काँग्रेसचे स्वातंत्र्यापासूनचे धंदे आहेत. काँग्रेसच्या मनात होतं तर लाडकी बहीण योजना का सुरू केली नाही ? ये पब्लिक है, सब जानती है, असं कदम यांनी म्हटलं आहे.
advertisement
मुंबईकरांसाठी टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे, यावर प्रतिक्रिया देताना कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. टोल माफीचा निर्णय लोकाभिमुख आहे. कोकणातली जनता सरकारवर आणखी खुश झाली आहे. लोकांचे हजारो रुपये वाचतील. मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. असे निर्णय घेण्यासाठी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असं कदम यांनी म्हटलं आहे.
Location :
Ratnagiri,Ratnagiri,Maharashtra
First Published :
October 15, 2024 10:44 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका; कदमांचा जोरदार पलटवार, म्हणाले स्पष्ट बोलणारा नेता पण..