Mhada lottery 2025 : म्हाडाच्या सोडतीसाठी अखेर मुहूर्त ठरला; 'या' एकाच दिवशी ठरणार घराचे मालक, संपूर्ण माहिती वाचा
Last Updated:
Mhada Lottery 2025 : म्हाडाने प्लॉटसाठी सोडतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे . सोडत 11 ऑक्टोबर रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात होईल.
मुंबई : म्हाडा कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाने ठाणे शहर तसेच जिल्हा,वसई येथील विविध गृहनिर्माण योजनेत उभारलेल्या 5354 सदनिका आणि कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंडांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
या वेळापत्रकानुसार अर्जदारांनी अनामत रकमेसह केलेले अर्ज आता 11 ऑक्टोबर 2025 रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे काढण्यात येतील. ही माहिती म्हाडाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली. सोडतीसाठी अर्जांची प्रारूप यादी 1 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://housing.mhada.gov.in
प्रसिद्ध केली जाईल.
अर्जदारांना प्रारूप यादी पाहून 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑनलाईन दावे आणि हरकती नोंदवता येतील. सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी 9 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता संकेतस्थळावर जाहीर केली जाईल.सोडतीमध्ये यशस्वी अर्जदार आणि प्रतीक्षेत असलेले अर्जदारांची नावे 11 ऑक्टोबर 2025 रोजी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होतील.
advertisement
कोकण मंडळाने सोडती पाच प्रमुख घटकांमध्ये विभागली आहे: 20% सर्वसमावेशक योजनेत 565 सदनिका, 15% एकात्मिक शहर योजनेत 3002 सदनिका, विखुरलेल्या सदनिकांसह 1746 सदनिका, 50% परवडणाऱ्या योजनेत 41 सदनिका, तसेच 77 भूखंड उपलब्ध आहे.
दरम्यान, सदर सोडतीसाठी एकूण 1,84,994 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी अनामत रकमेसह 1,58,424 अर्ज मिळाले आहेत. सोडतीत भाग घेण्यास इच्छुक सर्व अर्जदारांनी आपल्या अर्जांची स्थिती, प्रारूप यादी आणि अंतिम यादी काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. यशस्वी अर्जदारांना त्यांच्या निवडीबाबत संकेतस्थळावर अधिक माहिती दिली जाईल.
advertisement
म्हाडा कोकण मंडळाची ही सोडत एक मोठा संधी आहे, ज्याद्वारे हजारो लोकांना घर किंवा भूखंड मिळण्याची संधी मिळणार आहे. यामुळे गृहनिर्माण क्षेत्रात स्थिरता आणि पारदर्शकता सुनिश्चित होईल. संपूर्ण माहिती आणि अपडेट्ससाठी अर्जदारांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाची नियमित पाहणी करणे गरजेचे आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2025 11:34 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mhada lottery 2025 : म्हाडाच्या सोडतीसाठी अखेर मुहूर्त ठरला; 'या' एकाच दिवशी ठरणार घराचे मालक, संपूर्ण माहिती वाचा