सदावर्ते हा दरोडेखोर, बायकोच्या नावावर 45 लाख घेतले, त्याचं उत्तर द्याल का? ST कामगार संघटनेचं ओपन चॅलेंज

Last Updated:

सदावर्ते हा दरोडेखोर आहे. विजय मल्ल्यासारखा पळून जाईल. राज्य सरकारचं पद घ्यायचं. नथुराम गोडसे इतके आवडतात तर घरी लावा त्यांचा फोटो.

News18
News18
मुंबई :  महाराष्ट्र एसटी महामंडळ कामगार आणि सहकारी बँकेच्या व्यवहारावरून गुणरत्न सदावर्ते  आणि त्यांची जयश्री पाटील नेहमी वादात सापडले आहे.  आता पुन्हा एकदा कामगार संयुक्त समितीने दोघांवर गंभीर आरोप केला आहे. सदावर्ते हा दरोडेखोर आहे. विजय मल्ला सारखा पळून जाईल. सदावर्ते यांना जाहीर आव्हान आहे की जयश्री पाटील यांच्या नावे 45 लाख 50 हजार रुपये घेतले, त्याचं काय उत्तर द्याल? असा आव्हानाच  महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिलं आहे.
महाराष्ट्र एसटी महामंडळ कामगारांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबईत आझाद मैदानावर आंदोलनं केलं होतं. या आंदोलनासाठी गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्री पाटील या दोघांनी सहभाग घेतला होता. पण, या आंदोलनानंतर दोघांवर कामगार संघटनेनं गंभीर आरोप केले होते. आज मुंबईत महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सदावर्तेंवर गंभीर आरोप केले.
advertisement
सदावर्ते हा दरोडेखोर
नथुराम गोडसे अहवालावर फोटो लावला जात आहे. मुळात  सदावर्ते हाच ग्रहण आहे. एसटी बँक आशिया खंडातील नंबर 1 ची होती. आता शेवटीला आहे. सदावर्ते यांना जाहीर आव्हान आहे की, जयश्री पाटील यांच्या नावे 45 लाख 50 हजार घेतात, काय उत्तर द्याल? सदावर्ते हा दरोडेखोर आहे. विजय मल्ल्यासारखा पळून जाईल. राज्य सरकारचं पद घ्यायचं. नथुराम गोडसे इतके आवडतात तर घरी लावा त्यांचा फोटो. अहवालावर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नव्हता का लावायला? त्यांना सोयी प्रमाणे वापरतो हा माणूस, अशी टीका शिंदेंनी केली.
advertisement
सरकारकडे मागण्या
4 दिवसांपूर्वी आमची मुंबई येथे कृती समिती केली. सगळ्या पक्षाच्या सत्ताधारी आणि विरोधी संघटना एकत्र आलोय. अनेक वेळा आम्ही भेटलो. वेतन कमी करण्यात आले आहे. दिवाळीपूर्वी लागू करा, महागाई भत्ता द्यावा,  1% वेतन वाढीचा दर काढण्यात आला. 3% दर मान्य करून ही देण्यात आलं नाही. घरभाडा भत्ता लागू हवा. राज्य सरकार इतकं वेतन लागू करा, जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा आम्हाला सांगितलं होतं. आता  दिवाळी तोंडावर आहे 12,500 रुपये दिले जात होते तो द्यायला हवंय. एसटी कामगार फायदा मिळवून देतो पण आम्हाला काही मिळत नाही आम्हाला 15000 रुपये देण्यात यावे, अशी मागणी शिंदेंनी केली.
advertisement
13 ऑक्टोबरपासून मुंबईत धरणे आंदोलन
दिवाळीत आमची प्रवाशांच्या सेवेत जाते. 13 ऑक्टोबरपासून मुंबई सेंट्रल डेपोला धरणे धरणार आहोत, तरी ही मान्य नाही केलं तर राज्यभर आम्ही आंदोलन करू, इलेक्ट्रिकल गाड्या आल्यात त्यांचे लाड केले जातात. 2 अडीच लाखांनी तोटा झाला आहे. भाड्याच्या गाड्या कशाला हव्यात. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती होणार सांगितलं जातंय. एसटीच खाजगीकरण आम्ही होऊ देणार नाही. परिणाम काय होऊ शकतो याच विचार सरकारने करावा, काय करायचं झालं की आम्हाला बॅलन्स शीट दाखवलं जातात, असा इशाराही शिंदेंनी दिला.
मराठी बातम्या/मुंबई/
सदावर्ते हा दरोडेखोर, बायकोच्या नावावर 45 लाख घेतले, त्याचं उत्तर द्याल का? ST कामगार संघटनेचं ओपन चॅलेंज
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement