advertisement

राहुल गांधींशी संबंधित कंपनीवर कारवाई, राऊतांची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले नेहरूंनी...

Last Updated:

शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

News18
News18
मुंबई, 22 नोव्हेंबर : शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. 'मंगळवारी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ईडीनं कारवाई केली, यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. नॅशनल हेरॉल्डवर काल अचानक कारवाई झाली. पंडित नेहरूंनी स्थापन केलेलं ते ऐतिहासिक वृत्तपत्र आहे. नॅशनल हेरॉल्ड हळूहळू स्पर्धेत मागे पडलं असेल, हेरॉल्डला जगविण्यासाठी काही व्यवहार झाले. जे भाजपात गेले त्यांच्या प्रॉपर्टी जप्त झाल्या नाहीत. सरकार पराभवाच्या भीतीनं घाबरलेलं आहे', अशा शब्दात संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत? 
'संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. नॅशनल हेरॉल्डवर काल अचानक कारवाई झाली. पंडित नेहरूंनी स्थापन केलेलं ते ऐतिहासिक वृत्तपत्र आहे. नॅशनल हेरॉल्ड हळूहळू स्पर्धेत मागे पडलं असेल, हेरॉल्डला जगविण्यासाठी काही व्यवहार झाले. जे भाजपात गेले त्यांच्या प्रॉपर्टी जप्त झाल्या नाहीत. सरकार पराभवाच्या भीतीनं घाबरलेलं आहे. ही लढाई लोकशाही आणि स्वातंत्र्य वाचविण्यासाठी आहे, आम्ही सगळे त्याची किंमत चुकवत आहोत,' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्यांनी अहमदाबादमध्ये खेळवण्यात आलेल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनलच्या सामन्यावरून देखील भाजपवर निशाणा साधला होता. फायनलचे सामने एक तर मुंबईत वानखेडे मैदानावर होतात नाही तर दिल्लीच्या मैदानावर होतात. मात्र हा सामना अहमदाबादला झाला, क्रिकेटमध्ये राजकी लॉबी घुसली असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
राहुल गांधींशी संबंधित कंपनीवर कारवाई, राऊतांची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले नेहरूंनी...
Next Article
advertisement
Budget Stocks: बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; कोणाला फायदा होणार हे आधीच ठरले? 'सिक्रेट लिस्ट'ने वाढवलं टेन्शन
बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; कोणाला फायदा होणार हे आधीच ठरले
  • उद्या रविवार पण सुट्टी नाही

  • शेअर्सची सिक्रिट लिस्ट आली समोर

  • उद्यासाठी पैसे आजच तयार ठेवा!

View All
advertisement