सावंतवाडीची लाकडी खेळणी आता मुंबईत स्वस्तात विक्रीसाठी उपलब्ध, दादरमध्ये या ठिकाणी द्या भेट!
- Reported by:Pratikesh Patil
- Published by:Devika Shinde
Last Updated:
या स्टॉलवर 60 रुपयांपासून सुरू होणारी भिंगरी, खुळखुळा, 120 रुपयांपासून लाकडी गोळा, डमरू, आणि 350 रुपयांपर्यंत करंजी साचे मिळतात.
मुंबई : सावंतवाडी म्हटलं की लाकडी खेळणी, गंजिफा पत्ते आणि आंब्याच्या लाकडापासून बनवलेल्या वस्तू आपल्याला लगेच आठवतात. आता ही सुंदर आणि टिकाऊ लाकडी खेळणी मुंबईतील दादरमधील बाजारपेठेत अगदी कमी दरात मिळू शकतात. दादरमध्ये "नेचर हूड" या स्टॉलवर सावंतवाडीतील पारंपरिक लाकडी खेळणी आणि इतर वस्तू उपलब्ध आहेत.
मुंबईतील दादर भागात स्मित हास्य यांकडून ग्राहक पेट भरवण्यात आलेली आहे, ह्या ग्राहक पेठमध्ये सावंतवाडी येथील नेचर हुड करून स्टॉल आहे. या स्टॉलमध्ये सावंतवाडीतून बनवून आणलेल्या खेळणी आणि किचन साठी लागणारे साहित्य अगदी कमी दरात मिळतात.
या स्टॉलवर 60 रुपयांपासून सुरू होणारी भिंगरी, खुळखुळा, 120 रुपयांपासून लाकडी गोळा, डमरू, आणि 350 रुपयांपर्यंत करंजी साचे मिळतात. यासोबतच लाकडाच्या शोपीससाठी देवाच्या मूर्ती, गाड्या आणि विविध अँटिक पीसेस देखील इथे उपलब्ध आहेत.
advertisement
या दुकानात खेळणी तसेच शोपीसमध्ये लागणाऱ्या देवांच्या मुर्त्या गाडी अशी विविध अँटिक पीस लाकडांच्या वस्तू या दुकानात मिळतात. जर तुम्हाला अशीच लाकडी खेळणी, जेवनाची भांडी, लाकडी शोपीस पाहिजे असेल तर दादरमधील नेचर हूड या दुकानाला नक्की भेट द्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 21, 2024 6:56 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
सावंतवाडीची लाकडी खेळणी आता मुंबईत स्वस्तात विक्रीसाठी उपलब्ध, दादरमध्ये या ठिकाणी द्या भेट!









