Job : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कोणत्याही परीक्षेशिवाय SBI मध्ये अधिकारी बना; पॅकेज तब्बल 44 लाख

Last Updated:

Recruitment 2025 News : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी 996 जागांची भरती जाहीर झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2026 असून इच्छुकांनी sbi.bank.in वर अर्ज करावा.

News18
News18
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी ही एक उत्तम आणि सुवर्णसंधी मानली जात आहे.
SBI मध्ये अधिकारी होण्याची संधी
भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.bank.in ला भेट द्यावी. सुरुवातीला अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 डिसेंबर 2025 होती. मात्र अनेक उमेदवारांना तांत्रिक अडचणी येत असल्याने स्टेट बँकेने ही तारीख वाढवून 10 जानेवारी 2026 केली आहे.
44 लाखांचे पॅकेज अन् 996 पदांची भरती
या भरती अंतर्गत एकूण 996 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये VP Wealth, AVP Wealth आणि Customer Relationship Executive या पदांचा समावेश आहे. प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
advertisement
VP Wealth पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे आणि किमान 6 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. AVP Wealth पदासाठी ग्रॅज्युएशनसह रिलेशनशिप मॅनेजर म्हणून 3 वर्षांचा अनुभव असावा. तर Customer Relationship Executive पदासाठी केवळ ग्रॅज्युएशन पात्रता ठेवण्यात आली आहे.
पगाराच्या बाबतीतही ही भरती आकर्षक आहे. VP Wealth पदासाठी सुमारे 44.70 लाख रुपये, AVP Wealth पदासाठी 30.20 लाख रुपये, तर Customer Relationship Executive पदासाठी 6.20 लाख रुपये वार्षिक पॅकेज दिले जाणार आहे.या पदांसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीद्वारे होणार आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ही संधी नक्कीच गमावू नये.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Job : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कोणत्याही परीक्षेशिवाय SBI मध्ये अधिकारी बना; पॅकेज तब्बल 44 लाख
Next Article
advertisement
BMC Election Congress: मुंबईत वंचितनं १६ जागांवर गेम केला, काँग्रेस आता डाव पलटवणार! 'त्या' वॉर्डसाठी 'प्लान बी' आहे तरी काय?
मुंबईत वंचितनं १६ जागांवर गेम केला, काँग्रेस आता डाव पलटवणार! त्या वॉर्डसाठी 'प्
  • मुंबई महापालिकेत वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेसनं आघाडी केली.

  • वंचितसाठी ६२ जागा सोडल्या. मात्र, वंचितने यातील २१ जागा उमेदवार नसल्याचे

  • प्रचाराच्या धामधुमीत काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू

View All
advertisement