Solapur Crime : सख्खा भाऊच निघाला पक्का वैरी! कुणी विचारही केला असेल अशा ठिकाणी गाडून ठेवला मृतदेह, पण असं भिंग फुटलं!

Last Updated:

Solapur Brother killed Police Brother : नानासाहेब रामजी दिवेकर असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, त्यांचा खून स्वतःच्याच लहान भावाने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.

Solapur Brother killed Police Brother
Solapur Brother killed Police Brother
Solapur Crime New : देवगाव रंगारी येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा अत्यंत निर्घयपणे खून करून मृतदेह घराशेजारील शेडमध्ये पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात आणि पोलीस दलात मोठी खळबळ माजली असून, रविवारी हा सर्व प्रकार समोर आला. सुरुवातीला हा गुन्हा अज्ञाताने केल्याचा संशय होता, मात्र अवघ्या काही तासांतच तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि या गुन्ह्यातील मुख्य आरोपी घरातीलच व्यक्ती असल्याचं स्पष्ट झालं.

गेल्या काही काळापासून कौटुंबिक वाद

नानासाहेब रामजी दिवेकर असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, त्यांचा खून स्वतःच्याच लहान भावाने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. मृत नानासाहेब आणि संशयित आरोपी लहानू रामजी दिवेकर यांच्यात गेल्या काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू होते. याच वादाचा राग मनात धरून लहानूने 2 जानेवारीच्या रात्री ही हिंसक घटना घडवून आणली. जेव्हा नानासाहेब घरात गाढ झोपेत होते, तेव्हा त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement

पत्र्याच्या शेडमध्ये खड्डा खोदून मृतदेह गाडला

खुनाचा कोणताही पुरावा मागे उरू नये या उद्देशाने, लहानूने घराच्या जवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये खड्डा खोदून मृतदेह तिथे गाडून टाकला. सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब यांच्या पथकाने सखोल चौकशी केली असता, लहानूने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांना काही ठिकाणी माती उकरलेली दिसली अन् संशय निर्माण झाला होता. विशेष म्हणजे, नानासाहेब दिवेकर हे पोलीस दलात येण्यापूर्वी भारतीय लष्करात देशसेवा बजावत होते.
advertisement

एकट्याने खड्डा खोदून ‎मृतदेह कसा पुरला?‎

दरम्यान, लष्करातून निवृत्त झाल्यावर 7 वर्षांपूर्वी ते महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले होते आणि संभाजीनगर जिल्ह्यात कार्यरत होते. पण मृतदेह घरापासून काही‎अंतरावर कसा नेला? एकट्याने खड्डा खोदून ‎मृतदेह कसा पुरला?‎ कौटुंबिक वाद काय होता,‎तो टोकाला का गेला?‎ आणि गुन्ह्यात वापरलेले शस्त्र‎जप्त का केले नाही?‎ असे सवाल आता विचारले जात आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur Crime : सख्खा भाऊच निघाला पक्का वैरी! कुणी विचारही केला असेल अशा ठिकाणी गाडून ठेवला मृतदेह, पण असं भिंग फुटलं!
Next Article
advertisement
BMC Election Congress: मुंबईत वंचितनं १६ जागांवर गेम केला, काँग्रेस आता डाव पलटवणार! 'त्या' वॉर्डसाठी 'प्लान बी' आहे तरी काय?
मुंबईत वंचितनं १६ जागांवर गेम केला, काँग्रेस आता डाव पलटवणार! त्या वॉर्डसाठी 'प्
  • मुंबई महापालिकेत वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेसनं आघाडी केली.

  • वंचितसाठी ६२ जागा सोडल्या. मात्र, वंचितने यातील २१ जागा उमेदवार नसल्याचे

  • प्रचाराच्या धामधुमीत काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू

View All
advertisement