Astrology: 14 जानेवारीला सकाळी 08.52 वाजल्यापासून नशीब दगा देणार; या राशींना सावधानतेचा इशारा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology Marathi: ज्योतिषीय गणनेनुसार ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा सर्व राशींवर चांगला आणि वाईट परिणाम होत असतो. ग्रहांचे स्वामी सूर्य देव एका राशीत सुमारे 30 दिवस विराजमान असतात. सूर्याला पुन्हा त्याच राशीत येण्यासाठी साधारण 1 वर्षाचा कालावधी लागतो. जानेवारी 2026 हा महिना काही राशींसाठी चांगला असेल, तर काही राशींच्या लोकांनी काळजी घ्यावी.
हरिद्वारचे विद्वान ज्योतिषाचार्य पंडित श्रीधर शास्त्री याबद्दल अधिक माहिती देताना सांगतात की, जेव्हा सूर्य ग्रह एखाद्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला त्या राशीची संक्रांती म्हटले जाते. जानेवारी 2026 मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारी, बुधवारी असेल. सूर्यदेव आपला पुत्र शनीच्या मकर राशीत रात्री 8:52 वाजता प्रवेश करतील. सूर्याच्या या प्रवेशाचा काही राशींवर नकारात्मक प्रभाव पडेल. या राशींवर काय वाईट परिणाम होतील आणि कोणते उपाय करावे लागतील, ते सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
advertisement
मिथुन राशीचे स्वामी ग्रहांचे राजकुमार बुध आहेत. 14 जानेवारीच्या रात्री सूर्याचा मकर प्रवेश मिथुन राशीपासून अष्टम भावात होईल. ज्योतिषीय गणनेनुसार अष्टम भाव संकट आणि अचानक उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांचा असतो. या काळात मिथुन राशीच्या लोकांना आरोग्याच्या तक्रारी जाणवणे, अचानक धनहानी होणे किंवा मोठा खर्च उद्भवणे असे योग आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पंडित श्रीधर शास्त्री यांच्या मते, धनु, मिथुन, कर्क, कुंभ आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी 14 जानेवारीच्या रात्री 8:52 पासून काही खास उपाय करावेत, ज्यामुळे या गोचर काळातील समस्या कमी होतील. या काळात 'आदित्य हृदय स्तोत्रा'चे पठण करावे, सूर्याला अर्घ्य देताना पाण्यात गुळ मिसळावा, रविवारी गहू आणि लाल रंगाच्या वस्तू दान कराव्यात आणि सूर्य ग्रहाच्या 12 नावांचा दररोज 108 वेळा जप करावा. यामुळे नक्कीच लाभ मिळेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)










