SBI SCO Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करिअरची संधी! 42 वयापर्यंत करता येणार अर्ज, जाणून घ्या सर्व Details

Last Updated:

SBI SCO Recruitment 2025: एसबीआय बँकेमध्ये म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

News18
News18
बँकिंग क्षेत्रामध्ये करियर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसबीआय बँकेमध्ये म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. एसबीआयने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी 103 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. या भरती प्रक्रियेसाठी शेवटचा दिवस 17 नोव्हेंबर 2025 आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 8 वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे. कोणकोणत्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आहे, वयोमर्यादा किती? अशा सर्व गोष्टींची माहिती जाणून घेऊया...
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये होत असलेल्या नोकरभरतीत स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (SBI SCO Bharti) पदांसाठी नोकरभरती होत आहे. स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदाच्या 103 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. या नोकरभरतीची सुरूवात 28 ऑक्टोबरपासून झाली असून 17 नोव्हेंबर 2025 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ऑनलाईन पद्धतीने ही नोकरभरती केली जात आहे. जाहिरातीच्या PDF ची लिंक आणि ऑनलाईन अर्जाची लिंक देखील बातमीमध्ये देण्यात येत आहे. इच्छुक उमेदवार बातमीमध्ये लिंक घेऊ शकणार आहेत.
advertisement
अर्जाची लिंक - https://recruitment.sbi.bank.in/crpd-sco-2025-26-15/apply
स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी होत असलेल्या भरतीमध्ये हेड (Product, Investment And Research) साठी 1 जागा, झोनल हेड (Retail) साठी 4 जागा, रिजनल हेडसाठी 7 जागा, रिलेशनशिप मॅनेजर- टीम लीडसाठी 19 जागा, इन्व्हेस्टमेंट स्पेशालिस्ट (IS) साठी 22 जागा, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर (IO) साठी 46 जागा, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (बिझनेस) साठी 2 जागा आणि सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) साठी 2 जागा आहेत. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अनुभव देखील वेगवेगळा आहे.
advertisement
भरती प्रक्रियेमध्ये प्रत्येक पदाकरिता वेगवेगळी वयोमर्यादा आहे. हेड (Product, Investment And Research), झोनल हेड (Retail) आणि रिजनल हेड या पदांसाठी अर्जदाराचे वय 35 ते 50 वर्षे दरम्यान असावे. रिलेशनशिप मॅनेजर- टीम लीड आणि इन्व्हेस्टमेंट स्पेशालिस्ट (IS) या पदांसाठी 28 ते 42 इतकी वर्षे वयोमर्यादा आहे. इन्व्हेस्टमेंट ऑफिसर (IO) पदासाठी 28 ते 40 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (बिझनेस) पदासाठी 30 ते 40 वर्षे आणि सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) पदासाठी 25 ते 35 वर्षे वयोमर्यादा आहे. तर, वयोमर्यादेत अनुसूचित जाती- जमातीतील अर्जदारांना 5 वर्षाची सूट आणि इतर मागास वर्गातील उमेदवारांना 3 वर्षाची सूट देण्यात आली आहे.
advertisement
ऑनलाईन अर्ज भरण्याची आणि अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख एकच आहे. खुल्या प्रवर्ग, इतर मागास वर्ग आणि आर्थिक दुर्बळ घटक प्रवर्गातील अर्जदारांसाठी 750 रूपये अर्ज शुल्क आहे. अनुसूचित जाती- जमाती आणि अपंग व्यक्तींसाठी कोणतेही अर्ज शुल्क नसणार आहे. अर्जदारांना हे अर्जशुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा इतर ऑनलाइन पद्धतींनी अर्ज शुल्क भरावे लागेल. निवड प्रक्रिया ही उमेदवारांच्या मुलाखतींवर आधारित असेल. यामध्ये वैयक्तिक, टेलिफोनिक किंवा व्हिडिओ मुलाखतींचा समावेश असू शकतो. सीटीसी (CTC) ची चर्चा सुद्धा निवड प्रक्रियेचा भाग असू शकतो.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
SBI SCO Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करिअरची संधी! 42 वयापर्यंत करता येणार अर्ज, जाणून घ्या सर्व Details
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement