Jogeshwari Terminal: मुंबईत होतंय सातवं टर्मिनल, 'या' स्थानकाचा होणार कायापालट; स्टेशनला केव्हापासून होणार सुरूवात
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Jogeshwari Terminal Update: जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेससाठी टर्मिनस उभारण्यात येणार आहे. या टर्मिनसचे काम 2026 पर्यंत पूर्ण केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र या प्रकल्पात आता थोडा बदल करण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच पश्चिम रेल्वे मार्गावर आणखी एक टर्मिनस उभारण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस आणि बोरिवली टर्मिनसवरील गर्दीचा भार कमी करण्यासाठी जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर टर्मिनस उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेससाठी टर्मिनस उभारण्यात येणार आहे. या टर्मिनसचे काम 2026 पर्यंत पूर्ण केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र या प्रकल्पात आता थोडा बदल करण्यात येणार आहे.
प्रकल्पांतर्गत एक आयलंड प्लॅटफॉर्म आणि दोन नवीन मार्गिका उभारण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे. सध्या जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर दोन प्लॅटफॉर्म असून तीन मार्गिकांचे काम सुरू आहे. त्यात वाढ करण्याची योजना आहे.
advertisement
पश्चिम रेल्वेने पूर्वी केलेल्या उपाय योजनेनुसार, जोगेश्वरी टर्मिनन्समध्ये एक होम, एक आयलंड प्लॅटफॉर्म आणि तीन मार्गिकांचा बांधण्याचा समावेश होता. त्या स्थानकांवर 24 डब्यांची गाडी अगदी व्यवस्थित उभी राहू शकेल, या पद्धतीने हे रेल्वे स्थानक उभारले जाणार होते. त्या रेल्वे स्थानकाकरिता 76 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार होता. मात्र या नव्या प्रकल्पामुळे आता 50 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रकल्प दोन टप्प्यात उभारण्यात येणार आहे. त्यानुसार, पहिला टप्पा मार्च 2026 मध्ये तर दुसरा टप्पा डिसेंबर 2026 मध्ये पूर्ण होणार आहे.
advertisement
जोगेश्वरी हे मुंबई मधले सातवे टर्मिनस असणार आहे. ते सुरू झाल्यानंतर मुंबई उपनगरांतील प्रवाशांना अतिरिक्त मेल, एक्सप्रेस गाड्यांची सुविधा मिळणार आहे. यामुळे मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस आणि बोरिवली टर्मिनसवरील भार कमी होणार आहे. या संपूर्ण प्रोजेक्टसाठी रेल्वेचा 36.6 कोटींचा एकूण खर्च होणार आहे. जोगेश्वरी स्थानक एकूण दोन टप्प्यामध्ये बनणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये, 2 प्लॅटफॉर्म आणि 3 मार्गिका होणार आहे. तर, दुसऱ्या टप्प्यामध्ये 1 आयलंड प्लॅटफॉर्म, 1 शंटिंग मार्गिका आणि 1 देखभाल मार्गिका असे मार्ग बनणार आहे.
advertisement
जोगेश्वरी टर्मिनस एकदा प्रवाशांच्या सेवेमध्ये रूजू झाले की, टर्मिनसवरून दररोज अंदाजे 12 पेक्षा जास्त मेल, एक्सप्रेस या ठिकाणावरून धावतील. त्यामुळे गोरेगाव, मालाड आणि अंधेरीमधील प्रवाशांना ट्रेन पकडण्यासाठी वांद्रे किंवा मुंबई सेंट्रलकडे ट्रेन पकडण्यासाठी जाण्याची गरज देखील कमी भासणार असून, त्यामुळं त्यांच्या वेळेची बचतच होणार आहे. जोगेश्वरी टर्मिनसचे काम 76 टक्के पूर्ण झाले आहे. पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी आणि राम मंदिर लगतच नवीन टर्मिनस उभारण्यात येणार आहे. राम मंदिर रेल्वे स्थानक आणि जोगेश्वरी टर्मिनस यांच्यामधील अंतर सुमारे 500 मीटर आहे. राम मंदिराच्या विरार दिशेकडील पादचारी पुलाच्या पादचारी पुलाच्या उतरणीच्या पायऱ्यांची जोडणी जोगेश्वरी टर्मिनसला देण्यात येणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 29, 2025 7:07 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Jogeshwari Terminal: मुंबईत होतंय सातवं टर्मिनल, 'या' स्थानकाचा होणार कायापालट; स्टेशनला केव्हापासून होणार सुरूवात


