ठाण्यातील धक्कादायक प्रकार, वॉचमनचं 3 वर्षांच्या चिमुरडीसोबत नको ते कृत्य
- Published by:Prachi Amale
Last Updated:
स्थानिक रहिवाशांनी तत्काळ हस्तक्षेप करत वॉचमनला पकडले आणि संतापाच्या भरात त्याला बेदम मारहाण केली.
ठाणे : ठाण्यातील कासारवडवली परिसरात एक संतापजनक घटना घडली आहे. साई पार्थ इमारतीतील वॉचमनने मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावरून जात असलेल्या अवघ्या तीन ते चार वर्षांच्या निष्पाप चिमुरडीची छेड काढल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी आरोपी वॉचमनला पकडून चांगलाच चोप दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी लहानगी तिच्या कुटुंबीयांसह इमारतीच्या बाहेरून जात असताना, त्या ठिकाणी तैनात असलेला वॉचमन मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने अचानक त्या मुलीकडे अश्लील हावभाव केले. हा प्रकार पाहणाऱ्या स्थानिक रहिवाशांनी तत्काळ हस्तक्षेप करत वॉचमनला पकडले आणि संतापाच्या भरात त्याला बेदम मारहाण केली.
नेमकं काय आहे व्हिडीओमध्ये?
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून, त्यामध्ये महिला आणि नागरिक संतापाने आरोपीला मारहाण करताना स्पष्ट दिसतात. व्हिडिओत काही महिलांचा आवाज येत असून , ती फक्त तीन ते चार वर्षांची मुलगी आहे आणि हा तिची छेड काढत होता. या संतापजनक दृश्यांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.
advertisement
कठोर कारवाईची मागणी
या घटनेमुळे परिसरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, निवासी भागातील सुरक्षेच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले जात आहे. निष्पाप बालिकेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा प्रकार पोलिस आणि सोसायटी प्रशासनासाठीही गंभीर इशारा ठरत आहे. नागरिकांनी अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 22, 2025 8:10 PM IST