6000 मंदिरातून होणार एकनाथ शिंदेंच्या अध्यात्मिक कार्याचा प्रसार, वाढदिवसाचा प्लॅन ठरला!
- Reported by:Sitraj Ramesh Parab
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Eknath Shinde Birthday: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा हिरक महोत्सवी वाढदिवस श्री एकनाथ अध्यात्मिक सेवा वर्ष म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
मुंबई: शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हिरक महोत्सवी वाढदिवस श्री एकनाथ अध्यात्मिक सेवा वर्ष म्हणून साजरा करण्यात येणार आहे. शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेकडून नुकतीच याबाबत घोषणा करण्यात आलीये. 9 फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे यांचा 60 वा वाढदिवस असून त्यानिमित्त अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्या नेतृत्वात सन 2025 मध्ये 36 जिल्ह्यांत विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेनेतील सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी देखील सहभागी होतील.
60 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त राज्यातील 60 हजार पेक्षा अधिक विद्यार्थी वर्गास ई प्रणाली द्वारे अध्यात्मिक व पारंपारीक शिक्षण मिळणार आहे. त्यात 1 हजार कीर्तनकारांचा समावेश असेल. तसेच राज्यभर तालुका, जिल्हा, विभाग निहाय श्रीएकनाथ भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये अध्यात्मिक क्षेत्रातील प्रभावी कार्यातून शिवसेनेचे एक लक्ष सभासद सहभागी होणार असल्याची माहिती अक्षय महाराज भोसले यांनी दिलीये.
advertisement
संत साहित्य भेट
श्री एकनाथ अध्यात्मिक संवाद महाराष्ट्र दौरा काढण्यात येणार आहे. त्यासाठी शिवसेना अध्यात्मिक सेनेच्या धर्मवीर मुखपत्राची निर्मिती करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील आवश्यक असणाऱ्यांना भजन मंडळास संत साहित्य भेट देण्यात येईल. तसेच राज्यातील 6 हजार मंदिरात वर्षभर प्रत्येक महिन्याला कीर्तनातून शासकीय योजना व एकनाथ शिंदेच्या अध्यात्मिक क्षेत्रातील कार्याचा प्रसार होणार असल्याचं देखील भोसले यांनी सांगितलंय.
advertisement
राज्यात अध्यात्मिक अधिवेशने
श्री एकनाथ अध्यात्मिक सेवा वर्षात राज्यात अध्यात्मिक अधिवेशने घेण्यात येणार आहे. ही अधिवेशने विभागनिहाय असतील. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांत श्रीराम कथांचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील समस्या निवारणासाठी हेल्पलाईन निर्मिती करण्यात आल्याची माहिती देखील भोसले यांनी दिली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 30, 2025 8:19 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
6000 मंदिरातून होणार एकनाथ शिंदेंच्या अध्यात्मिक कार्याचा प्रसार, वाढदिवसाचा प्लॅन ठरला!










