Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana : राज्यात लवकरच श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना, कोणाला मिळणार लाभ?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana : महाराष्ट्रात लवकरच लवकरच 'श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना' सुरू होणार असल्याची चर्चा आहे.
मुंबई: महाराष्ट्रात लवकरच लवकरच 'श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना' सुरू होणार असल्याची चर्चा आहे. 'श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी' योजनेचा प्रस्ताव मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने राज्य सरकारला पाठवला आहे. या योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिल्यास सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टच्यावतीने ही योजना राबवण्यात येणार आहे. राज्यात मुली-महिलांसाठी विविध योजना सुरू आहेत. त्यानंतर आता सिद्धीविनायक मंदिराच्यावतीने गरजू मुलींसाठी आणखी एक योजना सुरू केली आहे.
योजना कोणासाठी?
राज्यात लवकरच श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना सुरू होण्याची शक्यता आहे. ही योजना 8 मार्च रोजी जन्मलेल्या मुलींसाठी असणार असून सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टची ही अनोखी योजना आहे. राज्य सरकारच्या मान्यतेसाठी ट्रस्ट कडून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
योजनेचा काय लाभ?
8 मार्चला जन्मलेल्या मुलींच्या नावाने 10 हजार रुपयांची मुदत ठेव केली जाणार आहे. 'लेक वाचवा व लेक शिकवा' मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी ट्रस्टकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सांगितले की, सिद्धीविनायक न्यायाच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली आहे. सरत्या आर्थिक वर्षात ट्रस्टला 133 कोटींचे उत्पन्न मिळाले. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 15 टक्क्यांनी उत्पन्नात वाढ झाली असल्याचे सरवणकर यांनी सांगितले.
दरम्यान, सिद्धीविनायक ट्रस्टच्यावतीने इतर अनेक उपक्रम राबवले जातात. यामध्ये गरजूंना वैद्यकीय कारणांसाठी आर्थिक मदत करणे, अभ्यासिका आदींचा समावेश आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 01, 2025 2:30 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana : राज्यात लवकरच श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना, कोणाला मिळणार लाभ?