Solapur To Indore Flight Service : सोलापूर ते इंदूर थेट हवाईप्रवास, लवकरच झेपावणार विमान, पाहा वेळापत्रक

Last Updated:

Solapur To Indore Flight : सोलापूर-मुंबई विमानसेवेचा आता इंदूरपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. स्टार एअरची ही सेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू राहणार असून सोलापूरच्या प्रवाशांना हवाई प्रवासाचा मोठा फायदा होणार आहे.

Solapur to Indore flight via Mumbai timetable
Solapur to Indore flight via Mumbai timetable
सोलापूर : सोलापूर शहरासाठी नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या सुरू असलेल्या सोलापूर-मुंबई विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आता हीच सेवा थेट इंदूरपर्यंत वाढवण्यात आली आहे. स्टार एअर या विमान कंपनीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोलापूरहून गोवा आणि मुंबईनंतर आता इंदूरकडेही विमानसेवा उपलब्ध होणार आहे.
सोलापूर-मुंबई-इंदूर असा असेल नवा हवाई मार्ग
सुरु होत असलेली ही विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस चालणार असून सोमवार, बुधवार आणि गुरुवार या दिवशी प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. सोलापूर आणि इंदूर या दोन महत्त्वाच्या शहरांमधील अंतर आता हवाई मार्गाने कमी वेळेत पार करता येणार असल्याने व्यापारी, व्यावसायिक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.
advertisement
कसे असेल नवीन वेळापत्रक?
उद्यापासून सोलापूर-मुंबई-इंदूर अशी ही विस्तारित विमानसेवा सुरू होत आहे. वेळापत्रकानुसार सोलापुरातून दुपारी 2.50 वाजता विमान उड्डाण घेईल. सुमारे 1 तास 5 मिनिटांच्या प्रवासानंतर दुपारी 3.55 वाजता हे विमान मुंबईत पोहोचेल. मुंबई विमानतळावर सुमारे 45 मिनिटांचा थांबा घेतल्यानंतर दुपारी 4.35 वाजता विमान इंदूरसाठी रवाना होईल. त्यानंतर संध्याकाळी 5.50 वाजता विमान इंदूर विमानतळावर पोहोचणार आहे.
advertisement
सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने ही विमानसेवा महत्त्वाची मानली जात असून भविष्यात आणखी शहरांशी हवाई संपर्क वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Solapur To Indore Flight Service : सोलापूर ते इंदूर थेट हवाईप्रवास, लवकरच झेपावणार विमान, पाहा वेळापत्रक
Next Article
advertisement
ZP Election : दोन जिल्ह्यांनी वाढवलं सगळ्या राज्याचं टेन्शन, जिल्हा परिषद निकालाबाबत मोठी अपडेट
दोन जिल्ह्यांनी वाढवलं सगळ्या राज्याचं टेन्शन, जिल्हा परिषद निकालाबाबत मोठी अपडट
  • जिल्हा परिषद निवडणुकीला मुहूर्त लागला असला तरी आता निकालाला ब्रेक लागण्याची शक्य

  • जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निकालावर प्रश्न निर्माण झाले आहे.

  • निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य केल्यास जिल्हा परिषदेचा निकाल रखडण्याची भीती

View All
advertisement