Mangalprabhat Loadha: विधानपरिषदेत मंगलप्रभात लोढा बोलले असं काही; विरोधक हसून झाले लोटपोट

Last Updated:

विधानमंडळाच्या विधानपरिषदेचे कामकाज सुरू असताना भाजपाचे नेते महायुतीचे मंत्री मंगलप्रभात लोढांनी असं काही विधान केलं की, अख्खं सभागृह हसून लोटपोट झालं.

News18
News18
मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. तसेच विधानपरिषदेच्या 11 रिक्त झालेल्या जागांसाठी देखील नेतेमंडळींकडून जोरदार फिल्डींग लावली जात आहे. दुसरीकडे राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी नेतेमंडळींकडून फिल्डींग लावण्याचे काम सध्या सुरू आहे. अशात विधानमंडळाच्या विधानपरिषदेचे कामकाज सुरू असताना भाजपाचे नेते महायुतीचे मंत्री मंगलप्रभात लोढांनी असं काही विधान केलं की, अख्खं सभागृह हसून लोटपोट झालं.
नेमकं काय घडलं? सभागृहाचे कामकाज सुरू असताना खाजगी विद्यापीठांत कौशल्य विकास लागू करावे, हे विधेयक मंत्री मंगल प्रभात लोढा विधानपरीषदेत मांडत होतेय पण त्यांना विधेयक नीट मांडता येत नव्हते. तसेच त्यांना काही कामानिमित्त सभागृहातून  लवकर निघणे गरजेचे होते. त्यामुळे "मला लवकर जायचे आहे, म्हणुन विधेयक नंतर मंजूर करा" अशी विनंती मंत्री लोढा यांनी केली. यावेळेस सभापती निलम गोऱ्हे म्हटल्या, " घ्या लवकर आताच मंजूर करुया" आणि काही वेळातच विधेयक मंजूर झाले. यामुळे मंत्री मंगलप्रभात  लोढा सभापतींचे आभार मानले.
advertisement
काय म्हणाले लोढा? यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी निलम गोऱ्हे यांचे विशेष आभार मानले. त्याचबरोबर निलम गोऱ्हे गेल्या काही वर्षांपासून ज्या प्रकारे सभागृहाचे कामकाज पाहत आहे, कारभार हाताळत आहेत ते काम कौतुकास्पद आहे, असं लोढा म्हणाले. यावर राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार यांनी टोला लगावला. "मग निलम गोऱ्हेंना पुन्हा सभापती करा", असं शशिकांत शिंदे म्हणाले. त्यावर लोढा यांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे. "माझेच माझ्या हातात नव्हते" असे मंगलप्रभात लोढांनी शशिकांत शिंदेंना उत्तर दिले. याचा अर्थ माझे मंत्रीपद माझ्या हातात नव्हते, असं लोढांना म्हणायचं होतं. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
advertisement
दुसरीकडे विधानपरिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक तोंडावर आली आहे. खरंतर आजच्या घडीला महायुतीचे संख्याबळ मोठे  आहे. त्यात भाजपाचे संख्याबळ सर्वाधिक आहे. त्यामुळे विधानपरिषदेला नवा सभापती भाजपाच्या मर्जीतला मिळण्याची शक्यता अधिक आहे. अशात शशिकांत शिंदेंनी कौशल्य विकास मंत्री मंंगलप्रभात लोढांना टोला लगावला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mangalprabhat Loadha: विधानपरिषदेत मंगलप्रभात लोढा बोलले असं काही; विरोधक हसून झाले लोटपोट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement