Shocking News : सिग्नलवर खिडकी उघडली अन् आयुष्यभरासाठी....; 'ठक-ठक' टोळीने उडवली पोलिसांची झोप

Last Updated:

Kashimira Shocking Case : काशिमिरा मिरा रोडवर ठक-ठक टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. गाडीच्या खिडकीवर ठक-ठक करून चालकाचे लक्ष विचलित करत त्यांनी मोबाईल, रोख आणि लॅपटॉप चोरी केले. पोलीस नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देत आहेत.

News18
News18
मुंबई : गाडी चालवताना कुणी खिडकीवर ठक-ठक केल्यास सावध राहणे खूप गरजेचे आहे ,नाहीतर तुमच्या महागड्या वस्तू हरवू शकतात. गेल्या काही महिन्यांपासून शांत असलेली ठक-ठक टोळी आता काशिमिरा परिसरात परत सक्रिय झाली आहे. या टोळीने एका दिवसात दोन चोरीच्या घटना घडवल्या आहेत ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
नेमकं घडते काय?
मिरा रोडवर राहणारा 45 वर्षीय बांधकाम व्यावसायिक दोन दिवसांपूर्वी सायंकाळी दहिसरहून घरी जात होता. दहिसर चेक नाका जवळ ट्रॅफिक सिग्नलवर पोहोचल्यावर दोन दुचाकीस्वार त्याच्या कारजवळ आले. त्यांनी गाडीच्या खिडकीवर ठक-ठक केले. चालकाने मदत हवी असे समजून खिडकी खाली केली आणि आरोपींनी त्याचा महागडा मोबाईल फोन पळवून नेला.
दुसरी घटना भक्ती वेदांत रुग्णालयाजवळ घडली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला टोळीने लक्ष्य केले आणि कारची काच फोडून आतील रोख रक्कम आणि लॅपटॉप चोरून नेले. काशिमिरा पोलीसांनी दोन्ही घटनांवर अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. त्यांनी सांगितले की घटनास्थळ आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासली जात आहेत आणि लवकरच आरोपी पकडले जातील.
advertisement
ऑईल गळतीचं नाटक
ही टोळी लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी खिडकीवर ठक-ठक करणे, टायर पंक्चर असल्याचे सांगणे, गाडीची काच फोडणे आणि संधी मिळताच महागड्या वस्तू पळवणे यासारखे प्रकार करते. पोलीस नागरिकांना अशा टोळ्यांपासून सतर्क राहण्याचा सल्ला देत आहेत. वाहन चालकांनी सुरक्षित अंतर ठेवा, खिडकी नीट बंद ठेवा आणि संशयास्पद व्यक्ती पाहिल्यास लगेच पोलीसांना सूचित करा.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Shocking News : सिग्नलवर खिडकी उघडली अन् आयुष्यभरासाठी....; 'ठक-ठक' टोळीने उडवली पोलिसांची झोप
Next Article
advertisement
ZP Election: सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ मिळाली, मग आता झेडपी निवडणूक किती टप्प्यात होणार? समोर आली अपडेट
सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ मिळाली, मग आता झेडपी निवडणूक किती टप्प्यात होणार? समो
  • जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला सोमवारी मोठा द

  • किती टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पार पडणार

  • निवडणूक कार्यक्रमाबाबत मोठी अपडेट समोर

View All
advertisement