Vasai Virar Result : हितेंद्र आप्पांचा विषय 'लय हार्ड', 90 जागा जिंकल्या असत्या, फक्त इथं बिघडलं गणित!

Last Updated:

बविआचे तीन आमदार पडल्यानंतर हितेंद्र ठाकूर यांच्यासमोर महापालिका राखण्याचे आव्हान होते. हे आव्हान त्यांनी लिलया पेलवत महापालिका राखत 71 जागा जिंकून आणल्या आहेत. पण हितेंद्र ठाकूर याहून जास्त जागा म्हणजेच जवळपास साधारण 90 जागा जिंकू शकले असते.

vasai virar election result 2026
vasai virar election result 2026
Vasai Virar Election Result 2026 : वसई विरार महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी आपली सत्ता कायम राखली आहे. खरं तर विधानसभा निवडणुकीत बविआचे तीन आमदार पडल्यानंतर हितेंद्र ठाकूर यांच्यासमोर महापालिका राखण्याचे आव्हान होते. हे आव्हान त्यांनी लिलया पेलवत महापालिका राखत 71 जागा जिंकून आणल्या आहेत. पण हितेंद्र ठाकूर याहून जास्त जागा म्हणजेच जवळपास साधारण 90 जागा जिंकू शकले असते. त्यामुळे साधारण 20 जागा आणखी जिंकू शकले असते पण त्या ठिकाणी गणित बिघडल्याने भाजपने बाजी मारली होती.
वसई विरार महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने 115 जागांपैकी 71 जागांवर विजय मिळवला तर भाजपला 42 जागा जिंकण्यात यश आले. शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसने 1 जागा जिंकली होती. या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांची बविआ ही 70 नव्हे तर 90 जागा जिंकू शकली,पण काही ठिकाणी बविआचा निसटता पराभव झाला. त्यामुळे ही प्रभाग नेमकी कोणती होती? हे जाणून घेऊयात.
advertisement

बविआचा 'या' जागांवर निसटता पराभव

Ward NoSeat NoReservationWinning CandidateWinner PartyWinner VotesRunner-up CandidateRunner-up PartyRunner-up VotesMargin
55ABCCगौरव वसंत राऊतभारतीय जनता पार्टी9,121हार्दिक राऊतबहुजन विकास आघाडी8,648473
55BGeneral (Women)संजना गणेश भायदेभारतीय जनता पार्टी9,410रिताबेन कनुभाई सरवैयाबहुजन विकास आघाडी8,2951,115
55CGeneral (Women)अॅड दर्शना त्रिपाठी कोटकभारतीय जनता पार्टी9,382अर्चना नयन जैनबहुजन विकास आघाडी8,443939
55DGeneralमेहुल अशोक शाहभारतीय जनता पार्टी9,200पंकज भास्कर ठाकूरबहुजन विकास आघाडी8,564636
66ABCC (Women)योगिता गवळी करंजकरभारतीय जनता पार्टी9,275ऋषिका रमाकांत पाटीलबहुजन विकास आघाडी8,2271,048
66DGeneralहितेश नरेंद्र जाधवभारतीय जनता पार्टी8,406स्वप्निल सुरेश पाटीललाबहुजन विकास आघाडी7,718688
1515BGeneral (Women)रितू चौबेभारतीय जनता पार्टी8193विजया विजय तोरणकरबहुजन विकास आघाडी7514679
1515CGeneralयोगेश सुरेशप्रताप सिंहभारतीय जनता पार्टी8021प्रिन्स अमरबहादूर सिंगबहुजन विकास आघाडी68131208
1515DGeneralचंद्रकांत लक्ष्मण गोरीवलेभारतीय जनता पार्टी8580विजय यशवंत घोलपबहुजन विकास आघाडी72911289
1717ABCC (Women)स्मिता भूपेंद्र पाटीलभारतीय जनता पार्टी10435शीतल मयुरेश चव्हाणबहुजन विकास आघाडी9853582
1717BGeneral (Women)बबिता देवराज सिंहभारतीय जनता पार्टी9416सुविधा संकित मानेबहुजन विकास आघाडी8417999
1717CGeneralजयप्रकाश सुरेश वझेभारतीय जनता पार्टी8961बालाजी जालिंदर रंजारेबहुजन विकास आघाडी78281133
1717DGeneralशरद शंकर सुर्वेभारतीय जनता पार्टी9297मनिष कमलेशकुमार जोशीबहुजन विकास आघाडी8366931
1818BGeneral (Women)हेमलता नवीन सिंहशिवसेना9763सरिता प्रमोद दुबेबहुजन विकास आघाडी9180583
1818CGeneral (Women)ख्याती संदीप घरतभारतीय जनता पार्टी9494अमिता कैलास पाटीलबहुजन विकास आघाडी8589905
2121AScheduled Casteविशाल रमेश जाधवभारतीय जनता पार्टी9714रुपेश सुदाम जाधवबहुजन विकास आघाडी9571143
2323BBCCमहेश सदाशिव सरवणकरभारतीय जनता पार्टी8965वंदेश पाटीलबहुजन विकास आघाडी8381584
2323CGeneral (Women)निम्मी निपूण दोशीभारतीय जनता पार्टी9213गीता आयरेबहुजन विकास आघाडी79831230
2323DGeneralप्रदिप नरसिंह पवारभारतीय जनता पार्टी9071प्रविण सिताराम नलावडेबहुजन विकास आघाडी78931178
advertisement
खरं तर या त्या वरील 19 जागा आहेत. ज्या जागांवर बहुजन विकास आघाडीची भाजपसोबत काँटे की टक्कर झाली होती. विशेष म्हणजे या प्रभागात बविआचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला आहे. म्हणजे काही मतं जर बविआला मिळाली असती तर या प्रभागात बविआ जिंकून आली असती. त्यामुळे बविआ जरी 71 जागा जिंकून आली असली तरी त्यांना आणखी 19-20 जागा जिंकायची संधी होती, या जागा जिंकून बविआ जवळपास 90 जागा जिंकू शकली असती.
advertisement
गेल्या महापालिका निवडणुकीचा निकाल पाहता यंदाच्या निवडणुकीतला विजयाचा आकडा कमीच आहे.गेल्या वेळी बविआने एकट्याने 106 जागा जिंकल्या होत्या, पण यंदा त्यांना 71 जागा मिळाल्या आहेत.त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत बविआला 35 जांगाच नुकसान झालं आहे. तसेच गेल्या निवडणुकीत 1 जागा जिंकणाऱ्या भाजपने यंदा 44 जागा जिंकल्या आहेत.त्यामुळे आता खऱ्या अर्थाने भाजपने महापालिकेत विजय मिळवला आहे पण त्यांना बहुमत गाठला आले नाही.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Vasai Virar Result : हितेंद्र आप्पांचा विषय 'लय हार्ड', 90 जागा जिंकल्या असत्या, फक्त इथं बिघडलं गणित!
Next Article
advertisement
Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement