Vasai Virar Election 2026 : प्रचाराला काही तास उरले असताना हितेंद्र ठाकूरांसोबत दगाफटका, बडा नेता भाजपच्या प्रचारात
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठीचा प्रचाराला अवघे काही तास उरले असताना बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांना मोठा धक्का बसला आहे. कारण बहुजन विकास आघाडीच्या एका बडा नेत्याने भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केल्याची घटना समोर आली आहे.
Vasai Virar Municipale Election 2026 : वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठीचा प्रचाराला अवघे काही तास उरले असताना बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांना मोठा धक्का बसला आहे. कारण बहुजन विकास आघाडीच्या एका बडा नेत्याने भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या नेत्याने नुसता प्रचार केला नाही तर बविआच्या उमेदवार उलटा झाला पाहिजे असे विधान करून एकप्रकारे मतदारांना त्याला पाडण्याचेच आदेश दिले आहेत. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
वसई विरारच्या राजकारणात बहुजन विकास आघाडीचे सर्वसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्यानंतर राजीव पाटील हे दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानले जातात. वसई विरार महापालिकेचे पहिले महापौर, कामगार नेते वसईतील बांधकाम व्यावसायीतील अग्रणी अशी त्यांची ओळख आहे.2009 मध्ये महापालिकेच्या स्थापनेनंतर शहराचे प्रथम महापौर पदाची संधी त्यांना मिळाली होतीय.त्यानंतर विधानसभा निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती. मात्र काही अंतर्गत बाबीमुळे त्यांना संधी मिळाली नव्हती.त्यामुळे ते प्रचंड नाराज होते, या दरम्यान ते भाजप प्रवेश करतील अशाही वावड्या उडाल्या होत्या.
advertisement
advertisement
दरम्यान आता महापालिका निवडणुकीत माजी महापौर राजीव पाटील बविआच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मैदानात सक्रिय झाले होते. त्यानंतर सोमवारी राजीव पाटील हे प्रभाग क्रमांक 16 मध्ये भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या निलेश चौधरी यांच्या भेटीला गेले होते. या भेटी दरम्यान त्यांनी कोणत्याही परिस्थितीत गावडे उलटा झाला पाहिजे, असे उद्गार काढले. त्यांचे हे उद्गार पाहून त्यांनी एकप्रकारे निलेश चौधरी यांना पाठींबा दर्शवला.खरं तर निलेश चौधरी हे राजीव पाटील यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांची भेट घेऊन त्याच्या प्रचारात सहभागी झाले होते.
advertisement
राजीव पाटील यांच्या भूमिकेमुळे हितेंद्र ठाकूर यांना मोठा धक्का बसला आहे.कारण प्रभाग क्रमांक 16 मधून बहुजन विकास आघाडीकडून धनंजय गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण राजीव पाटील यांनी धनंजय गावडे यांना पाठिंबा देण्याऐवजी थेट निलेश चौधरी यांना प्रचारात हजेरी लावल्याने बविआला मोठा धक्का बसला आहे. आता या भेटीचा प्रभाग क्रमांक 16 च्या निकालावर किती परिणाम करतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
view commentsLocation :
Vasai-Virar City,Thane,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 4:16 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Vasai Virar Election 2026 : प्रचाराला काही तास उरले असताना हितेंद्र ठाकूरांसोबत दगाफटका, बडा नेता भाजपच्या प्रचारात










