Western Railway : पश्चिम रेल्वेचा एक निर्णय अन् विरार लोकलचा प्रवास आता 'ऑन टाईम', कसा मिळणार दिलासा?

Last Updated:

Western Railway Update News : कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहावी रेल्वे मार्गिका सुरू झाल्याने विरार आणि डहाणू फास्ट लोकलची रखडपट्टी दूर होणार आहे. या निर्णयामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

News18
News18
मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी असून विरार फास्ट लोकल आता अधिक वेगाने धावणार आहे. पश्चिम रेल्वेच्या कांदिवली ते बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे विरार आणि डहाणूच्या दिशेने जाणाऱ्या फास्ट लोकल गाड्यांना होणारी रखडपट्टी दूर होणार आहे.
विरार लोकल प्रवाशांचे 'अच्छे दिन'
आतापर्यंत मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान मेल-एक्सप्रेस आणि लोकल गाड्या एकाच मार्गावरून धावत होत्या. त्यामुळे अनेक वेळा मेल-एक्सप्रेस गाड्यांमुळे लोकल सेवा विस्कळीत होत असे. विशेषतहा विरार फास्ट लोकल बोरिवली स्थानकाजवळ थांबवण्यात येत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.
पश्चिम रेल्वेवर मेल आणि एक्सप्रेस गाड्यांची संख्या वाढल्याने हा प्रश्न अधिक गंभीर झाला होता. याची दखल घेत पश्चिम रेल्वे प्रशासनाने कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. महिनाभरात ब्लॉक घेऊन आणि वेळापत्रकात बदल करत हे काम पूर्ण करण्यात आले.
advertisement
या नवीन सहाव्या मार्गिकेमुळे आता मेल-एक्सप्रेस आणि लोकल गाड्या स्वतंत्रपणे धावू शकणार आहेत. त्यामुळे लोकल सेवेला होणारा अडथळा कायमचा दूर होणार आहे.
काम पूर्ण झाल्यानंतर पश्चिम परिमंडळाचे रेल्वे सुरक्षा आयुक्त ई. श्रीनिवास आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मार्गिकेची तपासणी केली. आवश्यक स्पीड चाचण्या घेतल्यानंतर सहावी मार्गिका नियमित रेल्वे वाहतुकीसाठी खुली करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे बोरिवलीपुढे विरार आणि डहाणूच्या दिशेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Western Railway : पश्चिम रेल्वेचा एक निर्णय अन् विरार लोकलचा प्रवास आता 'ऑन टाईम', कसा मिळणार दिलासा?
Next Article
advertisement
Shiv Sena UBT: विजयाचा गुलाल सुकण्यापूर्वीच ठाकरे गटात भूकंप! ४ नगरसेवक 'नॉट रिचेबल', मातोश्रीचे टेन्शन वाढले
विजयाचा गुलाल सुकण्यापूर्वीच ठाकरे गटात भूकंप! ४ नगरसेवक 'नॉट रिचेबल'; मातोश्रीच
  • सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच ठाकरे गटाचे चार नवनिर्वाचित नगरसेवक 'नॉट र

  • गटनेता निवडीच्या बैठकीपूर्वीच हे नाट्य घडले

  • पक्षाने या नगरसेवकांच्या दरवाजावर 'व्हिप'ची नोटीस चिकटवली आहे.

View All
advertisement