मे महिन्याचे चटके फेब्रुवारीतच! मुंबईसह उपनगरात उष्णतेची लाट? हवामान विभागाकडून अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Sitraj Ramesh Parab
Last Updated:
Mumbai Weather: जानेवारी 2025 हा महिना मुंबईकरांसाठी गेल्या 15 वर्षांतील सर्वाधिक उष्ण महिना ठरला आहे. फेबुरवारीत मुंबईतील हवामानाची स्थिती कशी राहील? जाणून घेऊ.
मुंबई: गेल्या महिन्यात मुंबईतील कमाल तापमानाने उच्चांकी पातळी गाठली होती. कमाल तापमानाने 33.2 ची सरासरी गाठत 15 वर्षांपूर्वीचा उष्णतेचा विक्रम मोडीत काढला. आता फेब्रुवारीत देखील उष्णतेचा जोर कायम राहणार असून मे महिन्यातील चटके फेब्रुवारीतच बसण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीत देखील तापमानाने मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होण्याची शक्यता आहे. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
जानेवारीत उच्चांकी तापमान
यंदा मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. जानेवारी महिन्यातच कमाल तापमानाने ‘सरासरी’ पातळी ओलांडत 33.2 अंशांचा नवा उच्चांक गाठला. यापूर्वी 32.9 अंश इतक्या सरासरी कमाल तापमानाची नोंद जानेवारी 2009 मध्ये झाली होती. जानेवारीत मुंबईतील सरासरी तापमा 31.2 अंश सेल्सिअस असते. मात्र, गेल्या महिनाभरातील तापमानाचे 15 वर्षांपूर्वाचा विक्रम मोडीत काढत नव्या उच्चांकाची नोंद झाली होती. मात्र, दिवसभर उष्णतेनं हैराण मुंबईकरांन रात्रीच्या गारव्याने काहिसा दिलासा दिला.
advertisement
दिवसा कडक उन्ह, रात्री गारवा
मुंबई शहरासह उपनगरांत रात्री हवेत गारवा जाणवतो. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यात शहरातील किमान तापमान 20 अंशांपर्यंत नोंदवलं गेलं. कमाल तापमानात मात्र सातत्याने चढ-उतार होताना दिसले. संपूर्ण जानेवारीत कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिल्याचे नोंदवले गेले. सांताक्रूझ आणि कुलाबा येथील हवामान खात्याच्या मोजमाप केंद्रावर 32 ते 35 अंशांच्या दरम्यान तापानाची नोंद झाली.
advertisement
उत्तरेतील थंड वारे यंदा नाही
दरवर्षी मुंबईत थंडीची लाट आणणाऱ्या उत्तरेतील थंड वारे यंदा सक्रीय नव्हते. तर पूर्वेकडील कोरड्या वाऱ्यांच्या सक्रीयता जास्त राहिली, त्यामुळे दिवसभराच्या वातावरणात उष्मता अधिक जाणवतील. 3 जानेवारीला कमाल तापमानाने कहर केला. उष्णतेचा पारा 2016 नंतर सर्वाधिक म्हणजेच 36 अंशांची पातळी गाठली. मुंबईप्रमाणेच संपूर्ण देशात जानेवारी महिना अधिक उष्ण ठरला आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार 1901 नंतर यंदाचा जानेवारी महिना तिसरा सर्वाधिक उष्ण महिना म्हणून नोंदवला गेला आहे.
advertisement
फेब्रुवारी घाम काढणार
जानेवारी महिन्याप्रमाणेच फेब्रुवारी महिना देखील मुंबईकरांना घाम फोडणार आहे. या महिन्यात तापमानात अचानक मोठी वाढ होऊ शकते. तसेच ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’चा प्रभाव कमी झाल्याने देखील मुंबईच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. आठवाभरानंतर थंडीची तीव्रता कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 04, 2025 8:07 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मे महिन्याचे चटके फेब्रुवारीतच! मुंबईसह उपनगरात उष्णतेची लाट? हवामान विभागाकडून अलर्ट