Western Railway: प्रवाशांनो लक्ष असु द्या! विकेंडला पश्चिम रेल्वेवर असणार मेगाब्लॉक, 250 लोकल रद्द; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Western Railway Mega Block: येत्या विकेंडला पश्चिम रेल्वेवर वेगवेगळ्या वेळेमध्ये सहाव्या मार्गिकेचं कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या विकेंडला पश्चिम रेल्वेवर वेगवेगळ्या वेळेमध्ये मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेचं काम सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कामाला सध्या मुहूर्त मिळाला असून महिन्याभरात सहाव्या मार्गिकेचं काम आटोपलं जाणार आहे. कांदिवली ते बोरिवली या स्थानकादरम्यान सहाव्या मार्गिकेचं काम हाती घेण्यात आलं असून 250 हून अधिक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस मेगाब्लॉकचे असून या काळामधील टाईम टेबलच पाहून पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांनी प्रवासासाठी घराबाहेर पडावं.
20 डिसेंबर 2025 ते 18 जानेवारी 2026 पर्यंत हा विशेष मेगाब्लॉक घेतला आहे. प्रत्येक विकेंडला रेल्वेकडून विशेष मेगाब्लॉक घेतला जात आहे, त्याप्रमाणेच या विकेंडला देखील तब्बल 250 हून अधिक लोकल्स रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही येत्या विकेंडला पश्चिम रेल्वेवर प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आधी रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडाल. यापूर्वीही शेकडो लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. विशेष ब्लॉकमुळे प्रवाशांना चांगलाच फटका बसत आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी आणि शनिवारच्या मध्यरात्री पासून मेगाब्लॉकला सुरूवात होणार आहे.
advertisement
शुक्रवारी (09 जानेवारी) रात्री 11:15 पासून ते शनिवारी (10 जानेवारी) मध्यरात्री 03:15 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर आणि शनिवारी (10 जानेवारी) मध्यरात्री 01:00 वाजल्यापासून ते पहाटे 04:30 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात कांदिवली स्थानकावर पॉइंटची जोडणी करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर, रविवारी (11 जानेवारी) रात्री कांदिवली आणि मालाड स्थानकादरम्यान डाउन जलद मार्गावर मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप आणि डाउन जलद मार्गावर मध्यरात्री 01:00 ते सकाळी 06:30 वाजेपर्यंत तर धीम्या मार्गावर मध्यरात्री 01:00 ते पहाटे 04:00 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.
advertisement
पश्चिम रेल्वेवर लोकल प्रमाणेच लांब पल्ल्याच्या गाड्यांना सुद्धा मेगाब्लॉकचा फटका बसणार आहे. अनेक लांबपल्ल्याच्या सुपरफास्ट एक्सप्रेस आणि मेल यांना रद्द केले आहे तर काही गाड्या उशिराने चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही या काळात लांबपल्ल्याच्या गाडीने प्रवास करणार असाल तर व्यवस्थित विचारपूस करूनच प्रवास कराल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 4:08 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Western Railway: प्रवाशांनो लक्ष असु द्या! विकेंडला पश्चिम रेल्वेवर असणार मेगाब्लॉक, 250 लोकल रद्द; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा









