जे भंगारात फेकलं, तेच बनलं 3000000000 सोनं; तुमचा अंदाज साफ चुकेल... ही संस्था कोणती ते वाचा!
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
खरंच कोणी भंगार विकून करोडो कमवू शकतो का? असा प्रश्न जर आपल्याला कोणी विचारला तर आपण सहाजिकच नाही बोलू. पण एका सरकारी कार्यालयाने आपल्या कार्यालयातील भंगार सामान विकून करोडो कमावले आहे. नेमकं हे कोणतं कार्यालय आहे? किती पैसे कमावलेत? जाणून घेऊया....
[caption id="attachment_1492252" align="alignnone" width="1200"]Loc पश्चिम रेल्वे एका कारणामुळे मालामाल झाली आहे. फुकट्या प्रवाशांमुळे वैगेरे नाही तर थेट भंगारमुळे रेल्वे मालामाल झाली आहे. भंगाराच्या माध्यमातून रेल्वेने तब्बल 300 कोटी रुपये कमावले आहेत.[/caption]

भंगार विक्रीतून चक्क पश्चिम रेल्वेने थेट 300 कोटी रुपये कमावले आहेत. भंगार विक्रीमध्ये रेल्वेने वर्कशॉपमधील रूळ, खांब, धातूच्या वस्तू आणि तत्सम गोष्टींची विक्री केली आहे.

पश्चिम रेल्वेच्या ‘शून्य भंगार मोहिम’अंतर्गत मुंबई सेंट्रल, वडोदरा, रतलाम, राजकोट, भावनगर आणि अहमदाबाद या विभागातल्या कारखाना आणि कारशेडमधील भंगार गोळा करून विक्री केली जात आहे.
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेला त्यांच्या तिजोरीत भंगार विक्रीतून 2025- 26 या आर्थिक वर्षात आतापर्यंत 302 कोटी रुपयांहून अधिकचा महसूल मिळाला आहे.

रेल्वे मंडळाने निश्चित केलेल्या लक्ष्यापेक्षा साधारण 21 टक्के जास्त प्रमाणात भंगार विक्रीची कामगिरी करण्यात आली आहे. ज्यामुळे भंगार विक्रीची सर्वत्रच चर्चा होते.
advertisement

भंगार म्हटलं की आपण त्या गोष्टीकडे टाकाऊ वस्तू म्हणूनच पाहतो. मात्र याच भंगार वस्तूने रेल्वेला कोट्यवधींचा नफा करून दिला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 05, 2025 9:46 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
जे भंगारात फेकलं, तेच बनलं 3000000000 सोनं; तुमचा अंदाज साफ चुकेल... ही संस्था कोणती ते वाचा!


