मुंबई दर्शवणारी कलाकृती अन् सामाजिक संदेश, काला घोडा फेस्टिव्हलमध्ये घेतील लक्ष वेधून, एकदा Video पाहाच
- Published by:Mohan Najan
- Reported by:Nikita Tiwari
Last Updated:
तुम्हाला अनेक ठिकाणी सिल्व्हर म्हणजे चांदीरी रंगाच्या वेगवेगळ्या वस्तू कलाकृती मिळतील. त्यातच सर्वांच लक्ष वेधून घेणारी चांदीरी रंगाची ही घोड्याची कलाकृती देखील मध्यभागी साकारण्यात आलेली आहे.
निकिता तिवारी, प्रतिनिधी
मुंबई : 1998 साली सुरू झालेल्या काला घोडा आर्ट फेस्टिव्हलला यंदा 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे यावर्षी सिल्व्हर ज्युबिली साजरी होत आहे. तुम्हाला अनेक ठिकाणी सिल्व्हर म्हणजे चांदीरी रंगाच्या वेगवेगळ्या वस्तू कलाकृती मिळतील. त्यातच सर्वांच लक्ष वेधून घेणारी चांदीरी रंगाची ही घोड्याची कलाकृती देखील मध्यभागी साकारण्यात आलेली आहे.
advertisement
मुंबईच्या वेगवेगळ्या बाजू आणि काला घोडा आर्ट फेस्टिव्हलमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करणारी कलाकृती आपल्याला पाहायला मिळते. या कलाकृतीमध्ये आपल्याला मुंबईमधील बेस्ट बस असेल किंवा रेल्वे स्थानकाचे नाव असेल, रिक्षा आणि टॅक्सीचं एक वेगळंच रूप आपल्याला एकत्र या ठिकाणी पाहायला मिळते आहे. एकंदरीतच मुंबईकरांची प्रवासाची माध्यमे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.
advertisement
या आर्ट फेस्टिव्हलमध्ये अजून एक लक्षवेधक गोष्ट आपल्याला दिसते ती म्हणजे कावळा घोडा. कावळ्याला जसे फिरण्याचे स्वातंत्र्य असते तसे फिरण्याचे स्वातंत्र्य हे घोड्याला नसते तसेच. घोडा हा नेहमी बंधनात असतो म्हणून कावळा घोडा अशी कलाकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. कुठेतरी कावळा आणि घोडा यांना एकत्र घेऊन त्यांच्या स्वातंत्र्याबद्दल इथे भाष्य केले जात आहे. प्लास्टिकचे वाढते प्रदूषण सर्वांना जास्त त्रासदायक ठरत आहे. मात्र त्याचा सर्वात जास्त त्रास आपल्या जलस्त्रोतांना होतो. कुठेतरी आपल्या जलस्त्रोतांवर प्लास्टिकचा परिणाम होत आहे, असा संदेश दर्शवणारी कलाकृती या ठिकाणी साकार करण्यात आली आहे.
advertisement
चर्चगेट रेल्वे स्थानकापासून आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकापासून अगदी 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या जहांगीर आर्ट गॅलरी परिसराच्या बाहेरच तुम्हाला काला घोडा आर्ट फेस्टिव्हल हे ठिकाण पाहायला मिळेल. या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल आणि कलाकृती साकारणारे कलाकार महाराष्ट्रभरातून नव्हे तर देशभरातून आले आहेत. जर तुम्हाला देखील कलेचा विलक्षण अनुभव घ्यायचा असेल तर काला घोडा फेस्टिव्हलला नक्की भेट द्या.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 29, 2025 4:27 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबई दर्शवणारी कलाकृती अन् सामाजिक संदेश, काला घोडा फेस्टिव्हलमध्ये घेतील लक्ष वेधून, एकदा Video पाहाच