Kerala Landslide: केरळच्या वायनाडमध्ये निसर्ग कोपला, भुस्खलनामुळे आतापर्यंत 93 जणांचा मृत्यू
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
केरळच्या वायनाडमध्ये अतिवृष्टीमुळे भुस्खलन झालं. यामध्ये आतापर्यंत 93 लोकांनी आपला जीव गमावला आहे.
वायनाड, केरळ: केरळमधील वायनाड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात मृतांची संख्या 93 वर पोहोचली आहे. सीएम पिनाराई विजयन यांनी मंगळवारी संध्याकाळी ही आकडेवारी जाहीर केली. ते म्हणाले की वायनाडमधील भूस्खलन ही हृदयद्रावक आपत्ती आहे. खूप मुसळधार पाऊस पडला. संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला आहे. आम्ही आता 93 मृतदेह बाहेर काढले आहेत, परंतु संख्या बदलू शकते. तर 128 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
इतर राज्यांतून मदतीचा ओघ:
इतर राज्यांनी केरळला मदतीचा हात पुढे केला केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले की, "केरळ बँकेने सीएमडीआरएफला आधीच 50 लाख रुपयांचे योगदान दिले आहे. सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी 2 कोटी रुपये आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी 5 कोटी रुपयांच्या मदतीचे आश्वासन दिले आहे. राज्याने दोन दिवसांचा अधिकृत दुखवटा जाहीर केला आहे. सार्वजनिक कार्यक्रम आणि समारंभ पुढे ढकलण्यात आले आहेत. आम्ही विनंती करतो की शोक काळात राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवावा. असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
advertisement
नेमकं काय घडलं?
मंगळवारी सकाळी मेप्पडीजवळील डोंगराळ भागात भूस्खलन झाले, ज्यामध्ये मुंडक्काई, चुरामाला, अट्टामाला आणि नूलपुझा गावे सर्वाधिक प्रभावित झाली आहेत. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत असून मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने बाधित भागात अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पथके तैनात केली आहेत. एनडीआरएफची अतिरिक्त टीम वायनाडला रवाना झाली आहे. कन्नूर डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्सच्या दोन पथकांनाही बचाव कार्यात मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
advertisement
राहुल गांधींनी उठवला आवाज:
काँग्रेस नेते राहुल गांधींसाठी वायनाडच्या जनतेने नेहमीचं प्रेम दिले. त्यामुळे राहुल गांधींनी हा मुद्दा संसदेत उपस्थित केला. पूर्ण ताकदीने वायनाडला केंद्राने मदत करावी, अशी मागणी राहुल गांधींनी केली.
Location :
Kerala
First Published :
July 30, 2024 7:03 PM IST
मराठी बातम्या/देश/
Kerala Landslide: केरळच्या वायनाडमध्ये निसर्ग कोपला, भुस्खलनामुळे आतापर्यंत 93 जणांचा मृत्यू