लग्नाला फक्त 7 महिने पूर्ण, पण तरुणीवर कोसळला दु:खाचा डोंगर, पतीसोबत घडली धक्कादायक घटना

Last Updated:

newly married couple - नवरा-बायको दोघेही हसत-खेळत आयुष्य जगत होते. पण या घटनेने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
नरेश पारीक, प्रतिनिधी
चूरू - पती-पत्नीचे नाते सात जन्माचे असते असे म्हटले जाते. मात्र, लग्नाच्या 7 महिन्यानंतरच एका दाम्पत्यासोबत धक्कादायक घटना घडली. मावशीच्या मुलाच्या लग्नासाठी जात असलेल्या एका व्यक्तीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दयाप्त असे मृताचे नाव आहे. 26 वर्षीय दयाप्त हा हमीरवास येथील रहिवासी होता. चूरू-सरदारशहर रस्त्यावरील पिपलाना जोहडजवळ हा भीष अपघात झाला. दयाप्त याच्या पत्नीच्या हातावरील मेहंदीचा रंग अजून उतरलाही नव्हता. मात्र, त्याआधीच दयाप्तचे निधन झाले. याबाबत ठिमोलीचे सरपंच संजय प्रजापत यांनी लोकल18 शी बोलताना माहिती दिली.
advertisement
ठिमोली येथील रहिवासी खेमचंद सऊदी हा अरब येथून आला होता आणि रामपुरा येथे भाचाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी बसने चुरू येथे उतरला. तर हमीरवास येथील दयाप्त मावशीच्या मुलाच्या लग्नात आपल्या पत्नीसह रामपुरा येथे आला होता. तो दुचाकीने त्याचा मामा खेमचंदला घ्यायला आला होता आणि मामाला परत घेऊन दुचाकीने रामपुरा गावी जात होता.
advertisement
त्याचवेळी पिपलाना येथे मागून अत्यंत वेगाने येत असलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला टक्कर दिली आणि या भीषण अपघातात 38 वर्षीय खेमचंद आणि त्याचा 26 वर्षांचा भाचा दयाप्त भीषण जखमी झाले. यानंतर त्यांना तत्काळ राजकीय भरतिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, याठिकाणी उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. नवरा-बायको दोघेही हसत-खेळत आयुष्य जगत होते. मात्र, दुर्दैवाने दयाप्तचा अपघात झाला. या घटनेने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
लग्नाला फक्त 7 महिने पूर्ण, पण तरुणीवर कोसळला दु:खाचा डोंगर, पतीसोबत घडली धक्कादायक घटना
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement