IPS पुरन कुमार प्रकरणाचा तपास करणाऱ्या ASI चं उचललं टोकाचं पाऊल; डोक्यात झाडली गोळी
- Published by:Prachi Amale
Last Updated:
जातिवादाचा आधार घेऊन सिस्टम हायजॅक केल्याचा गंभीर आरोप त्यांनी वाय पूरन कुमार यांच्यावर केला आहे.
नवी दिल्ली : हरियाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) वाय पूरन कुमार यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. वाय पूरन कुमार यांच्या आत्महत्येची चौकशी करणारे एएसआय संदीप कुमार यांनी आत्महत्या केली आहे. रोहतक–सायबर सेलमध्ये तैनात एएसआय संदीप कुमार यांनी आत्महत्या केली.स्वतःवर गोळी झाडून त्यांनी आयुष्य संपवले आहे.
एएसआय संदीप कुमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी तीन पानींची सुसाइड नोट आणि एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. आयपीएस वाय पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वाय पूरन कुमार यांना भ्रष्ट अधिकारी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्याविरुद्ध अनेक पुरावे असल्याचे सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे.अटकेच्या भीतीने आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे.
advertisement
भ्रष्टाचारी कुटुंबाला सोडू नका, शेवटची मागणी
जातिवादाचा आधार घेऊन सिस्टम हायजॅक केल्याचा गंभीर आरोप त्यांनी वाय पूरन कुमार यांच्यावर केला आहे. मी माझ्या शहादतीतून चौकशीची मागणी करतो, असे सुसाइड नोटमध्ये लिहिले. तसेच या भ्रष्टाचारी कुटुंबाला सोडू नका, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
पुरन कुमारच्या पत्नीवर केले गंभीर आरोप
संदीप कुमार हे मूळचे जिंद येथील जुलाना येथील लधौत गावचे आहेत. रोहतकचे माजी एसपी नरेंद्र बिजार्निया हे एक प्रामाणिक अधिकारी होते. खंडणीचे पैसे पुरण सिंग यांच्यापर्यंत पोहोचले आहेत. ते म्हणाले, मी प्रामाणिक आहे हव तर माझ्या बँक खात्यांची चौकशी झाली करा एएसआय संदीप यांनी पुरण सिंग यांच्या पत्नीवरही गंभीर आरोप केले. व्हिडिओमध्ये संदीप यांनी सांगितले की, ते सत्याच्या लढाईत पहिले बलिदान देत आहेत.
advertisement
पुरन कुमार यांनी सुसाईड नोटमध्ये काय म्हटले होते?
पुरन कुमार यांनी देखील सुसाईड नोट लिहिली होती. त्यात पूरन कुमार यांनी त्यांना झालेल्या त्रासाबद्दल सविस्तरपणे लिहिले होते.हरियाणामध्ये काही वरिष्ठ अधिकारी 2020 पासून माझ्याबरोबर जाती आधारित भेदभाव करत होते. मानसिक छळ, सार्वजनिक अपमान आणि अत्याचाराने मी त्रस्त आहे. माझ्यासाठी हे सर्व सहन करण्यापलीकडे गेलय असं लिहिलय. सुसाइड नोटमध्ये पूरन सिंह यांनी म्हटले होते. तसेच त्यांनी सर्व संपत्ती पत्नी अमनीत कुमार यांच्या नावावर केली आहे. अमनीत कुमार सुद्धा IAS अधिकारी आहेत. पूरन कुमार यांची पत्नी अमनीत यांनी डीजीपी हरियाणा शत्रुजीत सिंह कपूर आणि एसपी रोहतक नरेंद्र बिजारणिया यांच्यावर त्यांच्या पतीचा मानसिक छळ, जाती-आधारीत भेदभाव आणि त्रास दिल्याचा आरोप केला आहे
view commentsLocation :
Delhi
First Published :
October 14, 2025 3:48 PM IST
मराठी बातम्या/देश/
IPS पुरन कुमार प्रकरणाचा तपास करणाऱ्या ASI चं उचललं टोकाचं पाऊल; डोक्यात झाडली गोळी