Ayodhya News : राम मंदिराची सुरक्षा करणाऱ्या SSF च्या जवानाचा गोळी लागून मृत्यू
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अयोध्येच्या रामजन्मभूमीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एसएसएफ जवानाचा संशयास्पद परिस्थितीत गोळी लागल्याने मृत्यू झाला.
अयोध्या : अयोध्येतील रामलल्लाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एसएसएफ जवानाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
अयोध्येच्या रामजन्मभूमीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एसएसएफ जवानाचा संशयास्पद परिस्थितीत गोळी लागल्याने मृत्यू झाला. घटनास्थळी तैनात असलेल्या सहकारी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शिपायाला रुग्णालयात नेले, तेथून त्याला ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले. ट्रॉमा सेंटरमध्ये डॉक्टरांनी जवानाला मृत घोषित केले.
गोळी कशी लागली नेमकं काय घडलं याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. या जवानाचं नाव शत्रुघ्न विश्वकर्मा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तो आंबेडकर नगर येथील रहिवासी होता.
advertisement
या जवानाच्या मृत्यूनंतर रामजन्मभूमीमध्ये खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडल्याची माहिती मिळाली आहे. नेमकी या जवानाला गोळी लागली कशी याबाबत आता चौकशी करण्यात येणार आहे.
रामलल्लाच्या सुरक्षेसाठी CRPF ऐवजी SSF या विशेष तुकडीची नेमणूक करण्यात आली होती. रामजन्मभूमी परिसराची सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या सुरक्षा व्यवस्थेत एसएसएफ तुकडी तैनात करण्यात आली आहे. त्यांना वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंगही देण्यात आलं आहे. त्यांच्यासोबत स्थानिक पोलिसांचीही तुकडी काम करत आहे.
Location :
Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
First Published :
June 19, 2024 8:34 AM IST