अयोध्येतील राम मंदिरात खळबळ, काश्मिरी तरुणाचा नमाज पठणाचा प्रयत्न; अलर्ट जारी
- Published by:Prachi Amale
Last Updated:
सुरक्षारक्षकांनी त्याला अडवले मात्र त्यानंतर या तरुणाने मंदिर परिसरातच घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
अयोध्या : अयोध्येतील भव्य राम मंदिर परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. श्रीनगरहून आलेल्या एका कश्मीरी तरुणाने राम मंदिर परिसरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी त्याला अडवले मात्र त्यानंतर या तरुणाने मंदिर परिसरातच घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे मंदिर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
राम मंदिराच्या दक्षिण बाजूला असलेल्या संबंधित व्यक्ती नमाज पठण करत असल्याचे काही भाविकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे परिसरात क्षणिक तणावाचे वातावरण निर्माण झाले.मंदिरात उपस्थित असलेल्या भाविकांनी नमाज पठण थांबवण्याचा प्रयत्न केला असता संबंधित व्यक्तीने घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन तेथे तैनात असलेल्या सुरक्षा दलांनी तत्काळ हस्तक्षेप करत त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला चौकशीसाठी नेण्यात आले.
advertisement
नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख पटली असून तो श्रीनगरच्या सोफिया भागातील रहिवासी अहमद शेख आहे. गुप्तचत्र यंत्रणा, स्थानिक पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी संयुक्तपणे चौकशी करत आहेत. मात्र, या प्रकरणावर जिल्हा प्रशासनाने अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तसेच श्रीराम मंदिर ट्रस्टनेही मौन बाळगले आहे.
advertisement
संशयीत व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून शहरात काश्मीरी शाल विक्रीसाठी आलेल्या काही व्यक्तींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे अयोध्येत सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, यापूर्वी सुमारे दोन वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यात अशीच घटना घडली होती. तेथे तीन मुस्लिम तरुणांनी राम मंदिर परिसरात प्रवेश करून नमाज पठण केले होते. मंदिराच्या पुजाऱ्यांनी विरोध करूनही ते न थांबल्याने प्रकरण चिघळले होते.
advertisement
अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक
अखेर पुजाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही भावांवर गुन्हा दाखल केला होता. अयोध्येतील ताज्या घटनेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
Jan 10, 2026 5:13 PM IST










