Toilet शोधत गेला अन् थेट कॉकपिटचा दरवाजा...; एअर इंडियाच्या विमानात थरार

Last Updated:

विमानतळावर सुरक्षित उतरल्यावर सीआयएसएफने त्या प्रवाशासह त्याच्या सोबत असलेल्या एकूण नऊ प्रवाशांना ताब्यात घेतले.

air India Express
air India Express
नवी दिल्ली : बंगळूरु ते वाराणसी जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या एका प्रवाशाने कॉकपिटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आहे. या धक्कादायक घटनेनंतर विमानात मोठी खळबळ उडाली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX-1086 या विमानप्रवासात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अपहरणाच्या भीतीने  विमानाच्या  कॅप्टने  कॉकपिटचे दार उघडले नाही.
विमान वाराणसी विमानतळावर सुरक्षित उतरल्यावर सीआयएसएफने त्या प्रवाशासह त्याच्या सोबत असलेल्या एकूण नऊ प्रवाशांना ताब्यात घेतले आणि सध्या त्यांची चौकशी सुरू केली. या घटनेमुळे वाराणसी विमानतळावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व संशयित प्रवाशांची चौकशी सुरू होती.

CISF ची टीम  विमानतळावर 

या प्रकरणाची माहिती देताना करताना फूलपूर पोलिसांनी सांगितले की, सीआयएसएफकडून या घटनेवर आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सर्व प्रवासी बंगळुरूचे रहिवासी असून ते वाराणसी येथे दर्शनासाठी आले होते. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने वाराणसी एसटीएफची टीमही विमानतळावर दाखल झाली आणि त्यांनी देखील चौकशी सुरू केली.
advertisement

शौचालय शोधत गेला अन्...

एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, संबंधित प्रवासी शौचालय शोधत असताना चुकून कॉकपिट प्रवेशद्वारापर्यंत पोहोचला होता. संबंधित अधिकाऱ्यांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली असून तपास सुरू आहे,  असे कंपनीने स्पष्ट केले.

विमानातील प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण 

या प्रवाशासोबत प्रवास करणाऱ्या इतर आठ प्रवाशांनाही चौकशीसाठी सीआयएसएफच्या ताब्यात देण्यात आले आहे. विमानातील एका प्रवाशाने ‘एक्स’वर (माजी ट्विटर) पोस्ट करत संपूर्ण घटनाक्रमाची माहिती शेअर केली. या कृत्यामुळे हवेत असताना विमानातील प्रवाशांमध्ये काही काळ भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
advertisement

कॉकपिटचे दार उघडण्याचा प्रयत्न 

CISF अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीत उघड झाले की त्या प्रवाशाने विमान प्रवासादरम्यान कॉकपिटचे दार उघडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सर्व प्रवासी सुखरूपपणे विमानातून बाहेर काढण्यात आले.
मराठी बातम्या/देश/
Toilet शोधत गेला अन् थेट कॉकपिटचा दरवाजा...; एअर इंडियाच्या विमानात थरार
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement