एक इंच जमिनीसाठी सख्खा भाऊ झाला वैरी, मध्यरात्री पेट्रोल टाकून घर पेटवलं, अख्खं कुटुंब होरपळलं

Last Updated:

बोधगया अमवा गावात मुकेश कुमारने एका इंच जमीन वादातून राणा कुलेश्वरच्या कुटुंबाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला, तिघे गंभीर भाजले, पोलीस तपास सुरू.

News18
News18
जमीन आणि संपत्तीच्या हव्यासामुळे कुटुंबात फूट पडते ही काय गोष्ट नवीन नाही. अगदी भाऊ भाऊ देखील एकमेकांची तोंड पाहात नाहीत. रक्ताची नाती किती टोकाला जाऊ शकतात,हे दाखवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्खा भाऊ पक्का वैरी झाला. त्याने एका इंचाच्या जमिनीसाठी चक्क कुटुंब संपवण्याचा डाव साधला. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. एका इंचाच्या जमिनीच्या वादातून मोठ्या भावाने आपल्याच सख्ख्या भावाच्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पती, पत्नी आणि त्यांची लहान मुलगी गंभीररीत्या भाजले असून, सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कुठे घडली घटना?
बिहारच्या गया जिल्ह्यातील बोधगया परिसरातून समोर आला आहे. बोधगया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमवा गावात शिक्षक राणा कुलेश्वर हे आपल्या कुटुंबासह राहतात. रोजच्याप्रमाणे सर्व कामे आटोपून राणा कुलेश्वर, त्यांची पत्नी नीलू कुमारी आणि त्यांची चिमुकली रात्री गाढ झोपेत होते. बाहेर किर्रर्र अंधार आणि शांतता होती. मात्र, ही शांतता एका भयानक कटाची चाहूल होती. रात्रीचे साधारण २:३० वाजले असावेत.
advertisement
दबा धरुन बसले आणि संधी साधली
जेव्हा हे कुटुंब साखरझोपेत होते, तेव्हा राणा यांचा मोठा भाऊ मुकेश कुमार आणि त्याची पत्नी खिडकीपाशी दबा धरून बसले होते. त्यांनी खिडकीवाटे खोलीत पेट्रोल ओतले आणि काही कळण्याच्या आतच तिथे आग लावून दिली. बघता बघता आगीच्या ज्वाळांनी खोलीला विळखा घातला. झोपेत असलेल्या या कुटुंबाला काही समजायच्या आतच आगीच्या झळा बसू लागल्या.
advertisement
चिमुकलीच्या किंकाळ्यांनी गाव हादरलं
आगीच्या ज्वाळांनी रौद्र रूप धारण केल्यावर नीलू आणि राणा यांना जाग आली. आगीच्या वेढ्यात अडकलेल्या आपल्या पोटच्या मुलीला वाचवण्यासाठी त्यांनी जिवाचा आकांत केला. या आगीत मुलीचा चेहरा आणि शरीर भाजले गेले. नीलू आणि राणा हे देखील आगीत होरपळले. त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी राहणारे लोक धावत आले आणि त्यांनी तातडीने खिडकी तोडून किंवा दरवाजा उघडून कुटुंबाला बाहेर काढले. सर्वांना तातडीने मगध मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
advertisement
फक्त एक इंच जमीन वादाचं कारण
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नीलू कुमारी यांनी रडत रडत आपली कहाणी सांगितली. त्या म्हणाल्या, आमच्या घरात जमिनीच्या वाटण्या झाल्या. पण मुकेश असं वाटत होतं की आम्हाला एक इंच जमीन जास्त मिळाली आहे. याच एका इंचाच्या जमिनीसाठी तो सतत भांडायचा. यापूर्वीही त्याने अनेकदा मारहाण केली होती. माझे सासू-सासरे आमच्यासोबत राहतात, त्यांनाही तो त्रास द्यायचा. पण तो आज इतक्या थराला जाईल, असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं." केवळ एका इंचाच्या जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाचं घर आणि कुटुंब राख करण्याचा हा प्रयत्न पाहून संपूर्ण गाव हादरून गेलं.
advertisement
पोलीस तपासात काय समोर आले?
या घटनेची माहिती मिळताच बोधगया पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, दोन्ही भावांमध्ये जमिनीचा वाद जुना होता आणि तो विकोपाला गेला होता. आरोपी मुकेश कुमार याने अत्यंत थंड डोक्याने हा कट रचून पेट्रोलचा वापर केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. "आम्ही पुराव्यांची जमवाजमव करत आहोत आणि आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल," असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले.
view comments
मराठी बातम्या/देश/
एक इंच जमिनीसाठी सख्खा भाऊ झाला वैरी, मध्यरात्री पेट्रोल टाकून घर पेटवलं, अख्खं कुटुंब होरपळलं
Next Article
advertisement
ZP Election : दोन जिल्ह्यांनी वाढवलं सगळ्या राज्याचं टेन्शन, जिल्हा परिषद निकालाबाबत मोठी अपडेट
दोन जिल्ह्यांनी वाढवलं सगळ्या राज्याचं टेन्शन, जिल्हा परिषद निकालाबाबत मोठी अपडट
  • जिल्हा परिषद निवडणुकीला मुहूर्त लागला असला तरी आता निकालाला ब्रेक लागण्याची शक्य

  • जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निकालावर प्रश्न निर्माण झाले आहे.

  • निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य केल्यास जिल्हा परिषदेचा निकाल रखडण्याची भीती

View All
advertisement