BJP Minister remark On Indian Army : भारतीय लष्कर PM मोदींच्या चरणी लीन, भाजप उपमुख्यमंत्र्याच्या वक्तव्याने नवा वादंग
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
BJP Minister remark On Indian Army : मध्य प्रदेशमधील भाजपचे मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर केलेल्या वक्तव्याने भाजप अडचणीत आली असताना आता आणखी एका नेत्याने बेजबाबदार वक्तव्य केले आहे.
BJP Minister remark On Indian Army : मध्य प्रदेशमधील भाजपचे मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर केलेल्या वक्तव्याने भाजप अडचणीत आली असताना आता आणखी एका नेत्याने बेजबाबदार वक्तव्य केले आहे. भारतीय लष्कर पंतप्रधान मोदींच्या चरणी लीन असल्याचे त्यांनी म्हटले.
मध्य प्रदेशाचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी "संपूर्ण देश, देशाची सेना आणि सैनिक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चरणांमध्ये नतमस्तक आहेत" असे वक्तव्य करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. जबलपूरमध्ये सिव्हिल डिफेन्स व्हॉलंटियर्सच्या प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले .
या विधानामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विरोधकांनी देवडा यांच्या वक्तव्यावर टीका करताना, भारतीय सेनेची स्वायत्तता आणि निष्पक्षता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारतीय लष्कर हे देशाच्या संविधानाच्या अधीन असून, ती कोणत्याही राजकीय नेत्याच्या चरणांमध्ये नतमस्तक नसते, असे विरोधकांचे म्हणणे आहे.
advertisement
या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर, मध्य प्रदेशातील मंत्री विजय शाह यांनीही यापूर्वी असेच एक विधान केले होते, ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सेनेच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले होते . या दोन्ही विधानांमुळे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर पक्षीय प्रचारासाठी सेनेचा वापर केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या वक्तव्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर पक्षीय प्रचारासाठी भारतीय लष्कराचा वापर केल्याचा आरोप करण्यात येत आहे. विरोधकांनी या विधानांचा निषेध करत, लष्कराच्या गौरवशाली परंपरेचा राजकीय फायद्यासाठी वापर होऊ नये, अशी मागणी केली आहे.
advertisement
संपूर्ण प्रकरणामुळे मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी काळात या विधानांवरून आणखी राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशानंतर देशाला संबोधित करताना, भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या धोरणात मोठा बदल झाल्याचे सांगितले. त्यांनी पाकिस्तानला कठोर इशारा देत, भारताच्या नागरिकांवर हल्ला केल्यास कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असे स्पष्ट केले .
Location :
Bhopal,Madhya Pradesh
First Published :
May 16, 2025 2:57 PM IST
मराठी बातम्या/देश/
BJP Minister remark On Indian Army : भारतीय लष्कर PM मोदींच्या चरणी लीन, भाजप उपमुख्यमंत्र्याच्या वक्तव्याने नवा वादंग