Budget Session 2024 : राहुल गांधींची अर्थसंकल्पावर टीका, अर्थमंत्री सीतारमण यांनी डोक्याला लावला हात
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
अर्थसंकल्पीय अधिवेशनावर राहुल गांधींच्या भाषणावेळी लोकसभेत गदारोळ झाला. राहुल गांधींचे भाषण सुरू असताना मंत्री किरेन रिजिजू यांनी टीका केली.
दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावरून सरकारवर निशाणा साधला. त्यांनी म्हटलं की, गेल्या दहा वर्षात देशात ७० पेपरफुटीच्या घटना घडल्या. अर्थसंकल्पाच्या भाषणात पेपरफुटीचा उल्लेखही केला नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनावर राहुल गांधींच्या भाषणावेळी लोकसभेत गदारोळ झाला. राहुल गांधींवर टीका करताना मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं की, तुम्हाला सभागृहाचे नियम माहिती नाहीत का? तुम्ही सदनाच्या अध्यक्षांना आव्हान देताय.
राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थसंकल्प तयार करणाऱ्या २० अधिकाऱ्यांमध्ये केवळ दोनच अल्पसंख्यांक किंवा ओबीसी समाजातील असल्याचं ते म्हटलं. यावेळी राहुल गांधी यांनीन हलवा सेरेमनीचा फोटो दाखवण्यासाठी परवानगी मागितली. राहुल गांधींना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी परवानगी नाकारली. मात्र तरीही राहुल गांधी यांनी हा फोटो अर्थमंत्री अर्थसंकल्पाच्या आधी हलवा तयार करत असल्याच्या वेळचा असल्याचं म्हणाले.
advertisement
अर्थसंकल्पावर टीका करताना अर्थसंकल्पाच्या आधी हलवा सेरेमनीचा फोटो दाखवत राहुल गांधी यांनी म्हटलं की, देशाचा हलवा केला केंद्रीय अर्थसंकल्प तयार करणाऱ्या २० अधिकाऱ्यांपैकी केवळ दोनच अल्पसंख्यांक समुदायातील आहेत. ते या फोटोतही नाहीत असं राहुल गांधी म्हणाले. यावेळीच निर्मला सितारमण यांनी डोक्याला हात लावला.
राहुल गांधी म्हणाले की, मला अपेक्षा होती की हा अर्थसंकल्प चक्रव्यूहाची ताकद कमी करेल, देशातील शेतकऱ्यांना मदत करेल. तरुणांना मदत करेल, मजूर, लहान व्यापाऱ्यांना मदत करेल. पण या अर्थसंकल्पाचा एकमेव उद्देश व्यापारात एकाधिकार, राजकारणात एकाधिकार भक्कम करण्याचाच दिसून आला. लोकशाहीचा पाया, डीप स्टेट आणि एजन्सींना यामुळे धोका आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 29, 2024 2:58 PM IST
मराठी बातम्या/देश/
Budget Session 2024 : राहुल गांधींची अर्थसंकल्पावर टीका, अर्थमंत्री सीतारमण यांनी डोक्याला लावला हात