Cough Syrup मध्ये विषारी रसायन, आणखी एका कफ सिरपवर कारवाई, सर्व Stock बाजारातून परत मागवला

Last Updated:

Toxic Cough Syrup: छिंदवाड्यात कफ सिरपमुळे 11 चिमुकल्यांचा बळी गेला असून कोल्ड्रिफ आणि नेक्स्ट्रो-डीएसवर बंदी घालण्यात आली आहे. इंदूरमध्ये तयार झालेली डिफ्रॉस्ट सिरपही बाजारातून परत मागवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

News18
News18
इंदूर: छिंदवाडा येथे किडनी फेल झाल्याने 11 बालकांचा मृत्यू झालेल्या प्रकरणानंतर कोल्ड्रिफ (Coldrif) आणि नेक्स्ट्रो-डीएस (Nextro-DS) या कफ सिरपवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर इंदूरमध्ये तयार होणाऱ्या डिफ्रॉस्ट सिरपला देखील बाजारातून परत मागवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
advertisement
लोक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने इंदूरच्या आर्क फार्मास्युटिकल्स कंपनीविरुद्ध कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. तसेच डिफ्रॉस्ट सिरपचा बॅच क्रमांक 11198 बाजारातून रिकॉल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय औषधि महानियंत्रक (भारत सरकार) तसेच हिमाचल प्रदेश आणि तमिळनाडूच्या औषध नियंत्रकांना पत्र लिहून आवश्यक ती कारवाई करण्यास सांगितले आहे.
advertisement
26 ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान छिंदवाडा जिल्ह्यात औषधि निरीक्षकांच्या टीमने औषध विक्री केंद्रे आणि रुग्णालयांची संयुक्त तपासणी केली. यावेळी अनेक गंभीर अनियमितता आढळून आल्या. टीमने एकूण 19 औषध नमुने तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्यापैकी 9 अहवाल राज्याला मिळाले असून 10 नमुन्यांच्या अहवालांची प्रतिक्षा सुरू आहे.
advertisement
तमिळनाडू सरकारच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोल्ड्रिफ सिरपमध्ये तब्बल 48.6% डायएथिलीन ग्लायकॉलची (Diethylene Glycol) मिसळ आढळली आहे. हा अत्यंत विषारी रसायन आहे. तर नेक्स्ट्रो-डीएस सिरपचा अहवाल अद्याप यायचा आहे. हा सिरप हिमाचल प्रदेशातील सोलन (बद्दी) येथील कंपनीने तयार केला असून त्याची तपासणी मध्यप्रदेश आणि हिमाचलमध्ये सुरू आहे.
advertisement
दोन रसायनांबाबत विशेष अलर्ट
राज्य सरकारने सर्व औषध निर्माते, निरीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांना विशेष सल्ला पत्र जारी केले आहे. यात क्लोरफेनिरामाइन मलेट (Chlorpheniramine Maleate) आणि फिनाइलफ्रिन एचसीएल (Phenylephrine HCl) या रसायनांच्या वापराबाबत विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे दोन्ही घटक खोकला-जुकामाच्या औषधांमध्ये सर्रास वापरले जातात. मात्र लहान मुलांना किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय यांचा वापर धोकादायक ठरू शकतो.
advertisement
औषध तपासणी आणि रिकॉल प्रक्रिया वेगात
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की संपूर्ण प्रदेशात औषध तपासणी मोहिमेला गती देण्यात आली आहे. ज्या सिरपवर शंका आहे त्यांना बाजारातून परत मागवले जात आहे. उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ल यांनी सांगितले की सरकारसाठी जनतेचे आरोग्य व सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. औषधांच्या गुणवत्तेबाबत कुठल्याही प्रकारचा तडजोड मान्य होणार नाही. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले असून सरकार सातत्याने याकडे लक्ष ठेवून आहे.
advertisement
SIT ठरवेल जबाबदारी
1 ऑक्टोबर 2025 रोजी जबलपूर, छिंदवाडा, बालाघाट आणि मंडला जिल्ह्यांच्या औषध निरीक्षकांचा समावेश करून विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्यात आले आहे. हे पथक प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करेल.
पीडित कुटुंबांना मदत
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी म्हटले की छिंदवाडा येथे कोल्ड्रिफ सिरपमुळे बालकांचे मृत्यू झाले ही अत्यंत दु:खद घटना आहे. तपास अहवाल आल्यानंतर मध्यप्रदेशात या सिरपच्या विक्रीवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. राज्यभरात विशेष मोहिम राबवून कोल्ड्रिफ सिरप जप्त केले जात आहे. मृत मुलांच्या पालकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
कमलनाथ यांची तीव्र प्रतिक्रिया
माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी एक्स (X) वर लिहिले की, विषारी कफ सिरप प्यायल्याने छिंदवाड्यात 10 बालकांचा मृत्यू झाला आहे. या दु:खद प्रसंगी माझ्या भावना पीडित कुटुंबांसोबत आहेत. पण हे लक्षात ठेवले पाहिजे की ही केवळ दुर्घटना नसून मानवनिर्मित शोकांतिका आहे.
कमलनाथ यांनी पुढे मागणी केली की मृत मुलांच्या पालकांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे नुकसानभरपाई मिळावी. तसेच सध्या आजारी असलेल्या बालकांच्या उपचाराचा खर्च कुटुंबियांना स्वतः उचलावा लागत आहे, सरकारकडून कुठलीही योग्य मदत मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ जबाबदारी स्वीकारून मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.
मराठी बातम्या/देश/
Cough Syrup मध्ये विषारी रसायन, आणखी एका कफ सिरपवर कारवाई, सर्व Stock बाजारातून परत मागवला
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement