बॉसने ओवरटाइम करुन घेतलं तर कंपनीला मोजावे लागतील दुप्पट पैसे, न्यू इयरआधी सरकारचं गिफ्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
कर्मचाऱ्यांना फुकटात राबवून घेणाऱ्या कंपन्यांसाठी नवा कायदा, ओवरटाइमचे द्यावे लागणार दुप्पट पैसे
तुमचा बॉस तुमच्याकडून कामाच्या तासाव्यतिरिक्त ओवरटाइम करुन घेतो का? फुकटात जास्तीचं काम करुनही त्याचा योग्य तो मोबदला दिला जात नाही का? 8 तासांहून अधिक काम करुन घेत असतील तर तुम्हाला हा नियम माहिती हवा, सरकारने न्यू इयरआधी कर्मचारी आणि कामगारांना मोठं गिफ्ट दिलं आहे. त्याचा फायदा कामगारांना आणि कर्मचाऱ्यांना होणार आहे. नवीन कामगार कायदे २१ नोव्हेंबर पासून लागू करण्यात आले आहेत.
नव्या कायद्यामध्ये ओवरटाइम बाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांकडून काम करुन घेतलं जात मात्र मोबदला दिला जात नाही, काहीवेळा मोबदलाच मिळत नाही अशीही तक्रार होता. या सगळ्या तक्रारी लक्षात घेऊन या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे. बॉसने तुमच्याकडून ओवरटाइम करुन घेतलं तर कंपनीला दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. नव्या कामगार कायद्यामध्ये ओवरटाइमचे दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत.
advertisement
उदा. तुमचे कामाचे तास हे नियमानुसार 9 तास असतील, तुमचा पगार 60 हजार रुपये असेल. प्रत्येक आठवड्याची मिळून तुम्हाला चार दिवस सुट्टी 26 दिवस काम, २६ दिवसांच्या कामाचे 2307 रुपये त्याला पुन्हा तासाच्या हिशोबाने करुन घ्या. प्रत्येक तासाला समजा 256 रुपये तुम्हाला पगार मिळत असेल तर ओवरटाइमसाठी 400 रुपये तुम्हाला कंपनीला द्यावे लागतील. प्रत्येक तासासाठी आता दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत.
advertisement
याचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे. तर फुकटात राबवून घेणाऱ्या कंपनीला मोठा फटका बसणार आहे. इतकंच नाही तर जे कर्मचारी पर्मनंट आहेत ज्यांची नोकरी पक्की आहे त्यांना एक वर्षानंतरही ग्रॅच्युटी मिळणार आहे. याआधी हा नियम पाच वर्षांसाठी होता. जर कर्मचारी कंपनीमध्ये साडेचार वर्षांपर्यंत कंपनीमध्ये काम करत असेल तरच त्याला ग्रॅच्युटी मिळणार असा नियम होता. मात्र हा कायदा बदलण्यात आला असून आता एक वर्षाची मुदत केली आहे.
advertisement
कंपनीमध्ये 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे कर्मचारी असतील तर त्यांचं हेल्थ चेकअप करणं आवश्यक आहे. 29 जुने आणि किचकट कायदे रद्द करण्यात आले असून नवीन कायदे आणण्यात आले आहेत. हे सगळे कायदे 21 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. यामुळे देशभरातील कोट्यवधी कामगारांना कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. श्रमदेव जयते अशा शब्दात पीएम मोदी यांनी या नव्या कायद्यांचे नियमांचे स्वागत केलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 22, 2025 12:52 PM IST
मराठी बातम्या/देश/
बॉसने ओवरटाइम करुन घेतलं तर कंपनीला मोजावे लागतील दुप्पट पैसे, न्यू इयरआधी सरकारचं गिफ्ट


